Amit Shah: अमित शाह यांचा विदर्भ दौरा, लोकसभेच्या 6 मतदारसंघांचा घेणार आढावा

Amit Shah Vidarbha Visit: भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे 5 मार्च रोजी विदर्भ दौऱ्यावर आहे. पश्चिम विदर्भ दौऱ्यातील सहा लोकसभांचा आढावा घेण्यासाठी, तसेच त्यात पूर्व विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश असणार आहे.
Amit Shah Vidarbha Visi
Amit Shah Vidarbha Visisaam tv
Published On

>> अक्षय गवळी

Amit Shah Vidarbha Visit:

भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे 5 मार्च रोजी विदर्भ दौऱ्यावर आहे. पश्चिम विदर्भ दौऱ्यातील सहा लोकसभांचा आढावा घेण्यासाठी, तसेच त्यात पूर्व विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश असणार आहे.

विदर्भातील सहा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी 5 मार्च रोजी अकोला जिल्हा दौच्यावर आहे. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जलसा येथे त्यांच्या पक्षाची बैठक पार पडणार आहे. या हॉटेल जलसाची आज अकोला पोलिसांकडून पूर्वतयारी म्हणून पाहणी करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amit Shah Vidarbha Visi
Lok Sabha Election 2024: भाजपने दिल्लीत प्रवेश वर्मा यांच्यासह 4 उमेदवारांचं कापलं तिकीट, मनोज तिवारी यांना पुन्हा संधी

यामध्ये भाजपचे महानगर अध्यक्ष विजय अग्रवालसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे हे उपस्थित होते. आज सायंकाळच्या सुमारास त्यांनी पाहणी केली आहे. तरीही अमित शाह यांचा अद्यापपणे अधिकृत दौरा आला नसून पूर्वतयारी म्हणून ही पाहणी झाली आहे. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम-यवतमाळ आणि बुलढाणा या चार आणि चंद्रपुर, वर्धा या लोकसभा मतदारसंघाचा आढावा ते घेणार आहे. या जिल्ह्यातील एकत्रित 400 भाजप पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत सवांद साधणार आहे. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार आहे, अशी माहिती अकोल्याचे भाजपचे प्रसिद्ध प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली आहे.

Amit Shah Vidarbha Visi
Lok Sabha Election 2024 : PM मोदी पुन्हा वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 195 जणांना मिळालं तिकीट

दरम्यान, पश्चिम विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंघ हा एकमेव भाजपचा गड म्हणून ओळख आहे. या विभागात अकोला लोकसभा मतदार संघ एकमेव खासदार असलेला संघ आहे. गेल्या काही लोकसभेच्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता भाजपनं आपला दबदबा अकोल्यात राखला आहे. आता आपकी बार 400 पार नारा देणाऱ्या भाजपने आता या पाचही जिल्ह्यावर आपलं लक्ष केंद्रीय केलं. या अनुषंगाने भाजपची ही मोठी बैठक होत आहे. मागील 15 फेब्रुवारीचा अमित शाह यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आता 5 मार्च रोजी अकोल्यात ते असणार आहेत. आता अमित शाह यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या भाजपच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com