BJP leader Vinod Nayak, who passed away after suffering a sudden heart attack in Kanpur. saam tv
देश विदेश

भाजपचे नवनियुक्त जिल्हामंत्र्याचे निधन; पक्षाचा अनुभवी चेहरा हरपला; राजकीय वर्तुळात हळहळ

BJP Kanpur District Minister Vinod Nayak Death: कानपूरमधील भाजपचे नवनियुक्त जिल्हा मंत्री विनोद नायक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे भाजपमध्ये शोककळा पसरली आहे.

Omkar Sonawane

कानपूरचे नवनियुक्त भाजपचे नवनियुक्त जिल्हामंत्री विनोद नायक यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 45 वर्षाचे होते. कानपूर जिल्ह्यातील सिकंदरा येथील परौख येथील गावात पक्षाच्या 'व्हिलेज चलो अभियान' अंतर्गत आयोजित एका कार्यक्रमाला जात होते. विनोद नायक पारोख गावात कामागारांसोबत बैठक आणि जनसंपर्काचे काम करत होते. अचानक त्यांना छतीत दुखू लागले आणि ते जागेवर कोसळले. उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले.

त्याठिकाणी त्यांची प्रकृती पाहाता डॉक्टरांनी त्यांना कानपूर येथील हार्ट इन्स्टिट्युटमध्ये पाठवले. घटनेची माहिती मिळताच भाजपच्या जिल्हाध्यक्ष रेणुका सचन यांनी स्वतः त्यांना कानपूरमध्ये कार्डीओलॉजीमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना त्यांचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

भाजपमध्ये शोककळा

भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी विनोद नायक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष रेणुका सचन म्हणाल्या, विनोद नायक यांचे निधन हे संघटनेसाठी एक मोठे आणि कधीही भरुन न येणारे नुकसान आहे. ते एक समर्पित कार्यकर्ते आणि उत्साही नेते होते. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे.

मूळचे सिकंदरा येथील विनोद नायक परिसरात खूप लोकप्रिय होते. पक्षाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांचे समर्थक आणि कार्यकर्तेही सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT