Political News NDA JDU X
देश विदेश

Political News : निवडणुकीपूर्वी NDA ला मोठा झटका, बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये एनडीए आघाडीला झटका बसला आहे. एनडीएमधील बड्या नेत्याने राजीनामा देत राजदमध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

Saam Tv

  • बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

  • जेडीयूचे संतोष कुशवाहा यांनी पक्ष सोडून राजदमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

  • या पक्षप्रवेशामुळे एनडीएच्या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

Politics News : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली एनडीए आघाडीला मोठा धक्का बसला आहे. एनडीएमधील जेडीयू पक्षातील एका बड्या नेत्याने राजीनामा देण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी माजी मंत्री लक्ष्मेश्वर राय यांनी पक्ष सोडला होता. लागोपाठ मोठे नेते जेडीयू पक्षातून बाहेर पडत असल्याने एनडीएला धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमधून (जेडीयू) संतोष कुशवाहा यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते (१० ऑक्टोबर) जेडीयूचा राजीनामा देत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष कुशवाहा यांनी तेजस्वी यांच्या पक्षांतून निवडणूक लढवण्यासाठी त्यांची जागा देखील निश्वित केली आहे.

नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतोष कुशवाहा यांनी केला आहे. यामुळे ते मागील काही काळापासून नाराज होते. या नाराजीमुळेच त्यांनी आता जेडीयूमधून बाहेर पडत राष्ट्रीय जनता दलात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जेडीयूसोबत एनडीए आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संतोष कुशवाहा जेडीयूकडून खासदार म्हणून निवडून आले होते. त्याआधी ते २०१० मध्ये भाजपचे आमदार होते. २०१३ मध्ये कुशवाहा भाजप सोडून जेडीयूमध्ये सामील झाले होते. आता जेडीयूमध्ये दुर्लक्ष होत असल्याने संतोष कुशवाहा हे राष्ट्रीय जनता दल म्हणजेच राजदमध्ये प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

SCROLL FOR NEXT