Shreya Maskar
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. आवळा चेहऱ्यासाठी नैसर्गिक स्वरुपातील क्लींजर म्हणून काम करते.
आवळा त्वचेतील मृत पेशी आणि मुरूमांची समस्या दूर होते. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच चेहऱ्याला कोणताही संसर्ग होत नाही.
आवळ्याचे फेस पॅक बनवण्यासाठी बाउलमध्ये आवळा पावडर, मध आणि दही एकत्र करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५- २० मिनिटांसाठी लावा आणि थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर त्वचेला गुलाबपाणी लावा. तसेच चेहरा मॉइश्चराइज करा. चेहऱ्याला तुम्ही आवळ्याच्या फेस पॅकने थोडे मालिश करा. जेणेकरून त्याचे पोषण मिळेल.
आवळ्याचे फेस पॅकमुळे सन टॅन, काळवंडलेली त्वचा, सुरकुत्या, पिंपल्स कमी होतात. तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा काळे डाग आले असतील तर ते मिनिटांत निघून जातात.
आवळ्यामधील पोषक घटकांमुळे त्वचेचा रंग आणि पोत चांगला होण्यास मदत होते. तसेच त्वचा चमकदार आणि तरूण राहते.
त्वचेचा पोत सुधारतो. त्वचा घट्ट आणि कोमल राहते. सैल पडलेली त्वचा घट्ट करते आणि नैसर्गिक आर्द्रता टिकवून ठेवते.
घरगुती कोणताही पदार्थ त्वचेवर लावताना त्याची पॅच टेस्ट आवर्जून करा. कारण नैसर्गिक पदार्थ जरी असले तर आपली त्वचा संवेदनशील असते. त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्यावी.