Aanandi Joshi : तिचं क्लिव्हेज किती डिप... मराठी गायिकेला पुण्यातील डॉक्टरचा आक्षेपार्ह मेसेज; नाव अन् पत्ता शोधून...

Aanandi Joshi Instagram Stories : मराठी गायिका आनंदी जोशीसोबत किळसवाणा प्रकार घडला. तिला एकाने अश्लील मेसेज पाठवला. या संपूर्ण घटनेची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Aanandi Joshi Instagram Stories
Aanandi Joshi Instagram Storiesinstagram
Published On
Summary
  • आनंदी जोशीसोबत घडला भयंकर प्रकार

  • एका यूजरने केला अश्लील, असभ्य मेसेज

  • इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितली आपबिती

Aanandi Joshi : मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर अभिनेते, अभिनेत्री, गायक, दिग्दर्शक ट्रोल होत असल्याचे पाहायला मिळते. बरेचदा दिसण्यावरुन, कपड्यांवरुन त्यांच्यावर लोक टीका करत असतात. काहीजण तर विचार न करता मर्यादा ओलांडत काहीही कमेंट करतात. असाच प्रकार एका मराठी गायिकेसोबत घडला आहे. गायिकेशी संबंधिक एका डॉक्टरने असभ्य, अश्लील कमेंट केली. तिने सोशल मीडियावर हा अनुभव शेअर केला.

मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली गायिका आनंदी जोशी हिच्यासोबत हा प्रकार घडला आहे. यासंबंधित माहिती तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत दिली. पहिल्या स्टोरीमध्ये तिने एका व्यक्तीबरोबर फोटो पोस्ट केला. माझ्या कॉन्सर्टसाठी ही व्यक्ती मागच्या वर्षी आली होती. त्याने माझ्याबरोबर काढलेला हा फोटो सुद्धा शेअर केला. मेसेज करुन माझ्या कामाचे कौतुक सुद्धा केले होते. आज सकाळी मला हा मेसेज दिसला.

त्यानंतर आनंदीने दुसरी स्टोरी शेअर केली. यात तिने स्क्रीनशॉट शेअर केला. यात आनंदीचाच फोटो होता, त्यात बघ किती डीप क्लिवेज आहे असे लिहिले होते. हा मेसेज त्या व्यक्तीनेच केला होता. त्याला तो मेसेज त्याच्या मित्राला पाठवायचा होता. पण चुकून तो मलाच पाठवला. तू चुकून मलाच मेसेज केला आहेस असे मीच त्याचा मेसेज केला. त्यानंतर तो मेसेज त्याने डिलीट केला.

Singer Anandi Joshi instagram story
instaSinger Anandi Joshi instagram story

आनंदीने पुढे स्टोरी शेअर करताना या संपूर्ण प्रकारावर भाष्य केले. मला त्याने काय मेसेज केला हे त्याबद्दल नाही. पण तो एक बालरोगतज्ज्ञ आहे. जो व्यक्ती एका मुलीच्या शरीरावर असं बोलतो. त्याला लहान मुलांच्या शरीराला स्पर्श करण्याची परवानगी असते. बोलू न शकणाऱ्या आणि स्वतःचा बचाव करू न शकणाऱ्या बाळांशी तो थेट संपर्कात असतो. ही गोष्ट मला खूपच भीतीदायक वाटते. म्हणूनच लोकांनी सतर्क राहावे आणि आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आनंदीने पोस्टमध्ये लिहिले.

Aanandi Joshi Instagram Stories
Priya Berde : चिमटे काढले, गाल ओढले; कमरेत हात घालून... लक्ष्याच्या बायकोकडून गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

अशा लोकांकडे किंवा त्यांच्या कमेंट्सकडे दुर्लक्ष करावे असे काहीजण म्हणतात. पण तसे केल्याने त्यांना वाटते की ते जसे वागतात ते योग्यच आहे. अशा लोकांकडून महिला, लहान मुल आणि प्राणी यांना धोका आहे. तेव्हा अशा गोष्टींकडे लक्ष दिले, तर अशा लोकांना ओळखणे आणि संभाव्य धोका टाळणे शक्य होते, असेही आनंदी जोशीने म्हटले. तिने कमेंट करणाऱ्या बालरोगतज्ज्ञांचे नाव आणि त्याचा पत्ता शोधून ही काढला.

Aanandi Joshi Instagram Stories
Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com