Police Constable Died Due To Heart Attack Saam Tv
देश विदेश

Bihar News: मैदानावरच मृत्यूचा थरार! व्हॉलीबॉल खेळताना आला हार्ट अटॅक; पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू

Police Constable Died Due To Heart Attack: बिहारमध्ये व्हॉलीबॉल खेळण्यासाठी गेलेल्या पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हार्ट अटॅकने या पोलिसाचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावरच व्हॉलीबॉल खेळताना एका पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पोलिसाचा मैदानाच मृत्यू झाला. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा बिहार पोलिस कॉन्स्टेबल संजीव कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजीव कुमार हे पोलिस लाईनमध्ये व्हॉलीबॉल खेळण्यासाठी गेले होते. याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. तेथे उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने डीएमसीएचमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथेही त्यांची प्रकृती ढासळल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यास सांगितले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजल्यानंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रडून रडून संजीव कुमार यांच्या कुटुंबीयांची अवस्था वाईट झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ अमित कुमारही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, लाहेरियासराय पोलिस स्टेशनच्या डायल 112 मधील डेप्युटेशन कॉन्स्टेबल संजीव कुमार हे मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्र यादव आहे. शनिवारी सकाळी 6 ते 2 ड्युटी केल्यानंतर सायंकाळी व्हॉलीबॉल खेळण्यासाठी पोलिस लाईनमध्ये ते आले होते. त्याचे काही मित्र व्हॉलीबॉल खेळत होते आणि ते बाजूला उभे होते. यादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते बेशुद्ध पडले.

अमित कुमार यांनी पुढे सांगितले की, संजीव कुमार यांची ढासळलेली तब्येत पाहून तेथे उभ्या असलेल्या इतर लोकांनी त्यांना पकडले. त्यांना तातडीने डीएमसीएचमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना पारस रुग्णालयात हलवण्यास सांगितले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. संजीव कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT