Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ! 'त्या' प्रकरणी पोलिस जाणार उच्च न्यायालयात

Allu Arjun News Update : पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रिमियरला झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ झाली आहे आता पुन्हा पोलिसांनी अल्लू अर्जुनला नोटीस दिलीये.
Entertainment News
Allu ArjunSaam Tv
Published On

साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन पुष्पा 2 चित्रपटामुळे जबरदस्त चर्चेत आहे. चित्रपटाने जगभरात नाव केले असताना मात्र एका प्रसंगामुळे अल्लू अर्जुन अडचणीत आहे. पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रिमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी आज ११ वाजता पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी काल अल्लू अर्जुनला याबाबत नोटीस देखील दिली आहे.

हैदराबाद येथील पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात पोलिसांनी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करत त्याला अटक देखील केले होते.

Entertainment News
Shivani Sonar : चमचमीत पदार्थांची मेजवानी अन् घरच्यांकडून लाड; थाटात पार पडलं शिवानी सोनारचे केळवण, पाहा PHOTOS

काय आहे नेमकं प्रकरण?

अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच आला आहे. या चित्रपटाने जगभरात मोठी कमाई केली आहे. मात्र चित्रपट प्रिमियर दरम्यान झालेल्या प्रसंगामुळे अल्लू अर्जुन आजही अडचणीतच आहे. हैदराबाद संध्या थिएटरमध्ये झालेल्या चित्रपटाच्या प्रिमियर शोला प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली होती. अल्लू अर्जुन उपस्थित राहणार असल्याने प्रेक्षकांनी बघण्यासाठी धाव घेतली यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी अल्लू अर्जुनला ताब्यात घेतले होते. तसचे थिएटर व्यवस्थापन आणि सुरक्षा पथकावर गुन्हा दाखल केला. १३ डिसेंबर रोजी अल्लू अर्जनुला अटक केल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र याचदिवशी तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. तुरूगांत एक रात्र घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अल्लू अर्जुनची सुटका करण्यात आली.

Entertainment News
Pushpa 2 Collection: 'पुष्पा 2'च्या कलेक्शनमध्ये सोमवारी घसरण, कमाईचा आकडा किती?

अल्लू अर्जुनचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिस उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात आता पोलिसांनी अल्लू अर्जुनला समन्स पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस या प्रकरणी कायदेशीर निर्णय घेतील. अल्लू अर्जुनच्या विरोधाती आरोप फेटाळल्यानंतर घडलेल्या प्रकरणाचे सीसीटिव्ही फुजेज देखील तपासले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com