Shivani Sonar : चमचमीत पदार्थांची मेजवानी अन् घरच्यांकडून लाड; थाटात पार पडलं शिवानी सोनारचे केळवण, पाहा PHOTOS

Shivani Sonar Kelvan : 'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शिवानीच्या घरी लग्नाआधीच्या समारंभांना सुरुवात झाली आहे. नुकतेच अभिनेत्रीचे केळवण पार पडले आहे.
Shivani Sonar Kelvan
Shivani SonarSAAM TV
Published On

सध्या मनोरंजन सृष्टीत लगीनघाई पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार आपल्या नव्या आयुषाला सुरुवात करत आहेत. आता 'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच शिवानी सोनारचे (Shivani Sonar) केळवण पार पडले आहे. अभिनेत्रीचे केळवण (Kelvan ) थाटात आपल्या कुटुंबासोबत पार पडले आहे.

शिवानी सोनार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील अपडेट सोशल मीडियावरच्या माध्यमातून ती चाहत्यांना सांगते. नुकतेच शिवानीने केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या दोघांनी थाटात साखरपुडा केला होता. शिवानी सोनारला 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली.

शिवानीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कुटुंब तिचे केळवण करताना पाहायला मिळत आहे. या फोटोंना अभिनेत्रीने खूपच हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "घरच केळवण/ लाड" तिच्या या फोटोंवर कलाकार मंडळी, चाहते यांच्याकडून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. शिवानी सोनार 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेता अंबर गणपुळेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

शिवानीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये चमचमीत पदार्थांनी भरलेले ताट पाहायला मिळत आहे. तसेच ताटाच्या भोवती सुंदर रांगोळी काढली आहे. ताटात फिश फ्राय, कोलंबी, सोलकढी आणि भात-भाकरीचा बेत करण्यात आला आहे. तसेच गोड पदार्थही पाहायला मिळत आहे. यात केक, मिठाई, कॅडबरी फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

Shivani Sonar Kelvan
Pushpa 2 Collection: 'पुष्पा 2'च्या कलेक्शनमध्ये सोमवारी घसरण, कमाईचा आकडा किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com