Shivani And Amber Engagement: ‘एक दिन आप यूँ…’; शिवानी सोनार-अंबर गणपुलेने उरकला गुपचूप साखरपुडा

Shivani Sonar And Amber Ganpule: नुकतंच शिवानी सोनारने बॉयफ्रेंड आणि अभिनेता अंबर गणपुलेसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
Shivani Sonar And Amber Ganpule Engagement
Shivani Sonar And Amber Ganpule EngagementInstagram/ @shivani.sonarofficial_

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement

२०२४ या वर्षामध्ये बहुतांश मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. शिवानी-अजिंक्य, तितीक्षा-सिद्धार्थ, पूजा- सिद्धेश, प्रथमेश- क्षितीजा, योगिता-सौरभ या सेलिब्रिटी कपलनंतर आता आणखी एक कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच शिवानी सोनारने गुपचूप साखरपुडा आटोपला आहे. अभिनेत्रीने अभिनेता अंबर गणपुलेसोबत गुपचूप साखरपुडा उरकला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (Tv Serial)

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement
Sai Tamhankar Bought Luxury Car: सई ताम्हणकरसाठी २०२४ हे वर्ष ठरलं खास, गुढी पाडव्याचा मुहूर्तावर अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार

अंबर आणि शिवानीने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत, साखरपुडा गुपचूप आटोपला. साखरपुड्यातले अनेक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यांच्या सेलिब्रिटी मित्रांनी त्यांना सोशल मीडियावरून दोघांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नुकतीच शिवानीने साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. दोघेही एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहेत. (Social Media)

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर साखरपुड्यातले फोटो काही वेळापूर्वीच शेअर केलेले आहेत. “अलेक्सा “एक दिन आप यूं हमको मिल जायेंगे” गाणं प्ले कर... #Ambani” असं कॅप्शन अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेले आहेत. शिवानी आणि अंबरने साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. शिवानीने साखरपुड्यामध्ये, गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा वेअर केलेला होता. तर अंबरने जांभळ्या रंगाचा लखनवी कुर्ता आणि पायजमा परिधान केलेला दिसत आहे. शिवानी आणि अंबर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते. (Televesion Actor)

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement
भव्य दिव्यता, राजेशाही थाट, रोमान्स अन् ड्रामा... संजय लील भन्साळी यांच्या ‘Heeramandi’ सीरिजचा थक्क करणारा Trailer Out

शिवानीच्या या साखरपुड्याच्या पोस्टवर अभिनेत्री भाग्यश्री मोटे, ऋतुजा देशमुख, ऋचा आपटे, सुकन्या मोने, सुयश टिळक, अनघा अतुल, आरती मोरे अशा अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शिवानी व अंबरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवानी आणि अंबरच्या कामाबद्दल सांगायचे तर, शिवानी अलीकडेच कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत होती. तिने मालिकेत सिंधुताई सकपाळ यांची भूमिका साकारली होती. नुकतीच ती मालिका ऑफ एअर झाली. तर अंबर ‘रंग माझा वेगळा’नंतर ‘लोकमान्य’ मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने गोपाळ गणेश आगरकर यांची भूमिका साकारली होती. (Entertainment News)

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement
Maidaan X Review: “चित्रपट नाही, जणू फुटबॉलचं मैदानच...” अजय देवगणचा ‘मैदान’ चाहत्यांना कसा वाटला ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com