अखेर अजय देवगणचा ‘मैदान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. तब्बल पाच वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर चित्रपट अखेर आज थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. कधी कोरोना महामारीमुळे, कधी वादामुळे तर कधी अन्य कारणामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला अडचण येत होती. चित्रपट १० एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला आहे. अजय देवगणच्या ‘मैदान’ सोबतच थिएटरमध्ये, टायगर आणि अक्षय कुमारचा ‘बडे मियां, छोटे मियां’ देखील रिलीज झालेला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. जाणून घेऊया, प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटला.
भारतीय फुटबॉलचे कोच अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची कथा आहे. अब्दुल रहीम यांनी भारतीयांना फुटबॉलचे महत्व सांगत त्यांना हा खेळ खेळायला शिकवला. एका साध्या मैदानापासून सुरू झालेला हा खेळ थेट ऑलिम्पिकच्या सेमीफायनलपर्यंतचा प्रवास चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. या व्यक्तीने आपल्या हाताशी धरून अनेक लहान मुलांना, तरुणांना हाताशी घेऊन कशी ट्रेनिंग दिली आणि त्यांना थेट आंतरराष्ट्रीय सामन्यात कसं उतरवलं, ही कहाणी आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळेल.
चित्रपट पाहिल्यानंतर एका युजरने सांगितले, “अप्रतिम चित्रपट आहे. चित्रपटाचा पहिला भाग थोडा हळू आहे. दुसरा भागामध्ये कथा अगदी व्यवस्थित उलगडताना दिसत आहे. चित्रपट पाहिला तेव्हा वाटलंच नाही, हा मी चित्रपट पाहतोय. असं वाटत होतं की, एका फुटबॉलच्या मैदानात बसून मी हा चित्रपट पाहतोय की काय ? असं वाटत होतं. चित्रपटाचा क्लायमेक्स खूपच अप्रतिम आहे. चित्रपटाचं कथानक खुर्चीला खिळवून ठेवणारं आहे. अभिनय, म्युझिक खूपच अफलातून आहे.”
तर आणखी एक युजर म्हणतो, दमदार कथानक आहे, चित्रपट पाहतान सर्वच ठिकाणी अगदी Realistic जाणवलं. दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या कथेला उत्तम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुसता ब्लॉकबस्टर चित्रपट नाही पण, मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट नक्कीच. अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिलेल्या आहेत. अनेक युजर्सने अजय सह सर्वच सेलिब्रिटींच्या अभिनयाचं कौतुक केलेलं आहे.
स्पोर्ट्स ड्रामा 'मैदान' चित्रपटात मुख्य भूमिकेत, अजय देवगण, प्रियामणी राज, नितांशी गोयल, किर्ती सुरेश, अभिनय राज, बोमन ईरानी, जॉनी लिव्हर, गजराज राव सह अनेक सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमित शर्मा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. झी स्टुडिओज आणि बायव्ह्यू प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट्सच्या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.