Prasad Jawade Post: "...अन् अमृताने ते फारच सिरीयसली घेतलं"; प्रसाद जवादेची बायकोसाठी खास पोस्ट

Prasad Jawade And Amruta Deshmukh News: ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ पार पडला या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री अमृता देशमुख हिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने प्रसादने बायकोसाठी खास पोस्ट लिहिलीय.
Prasad Jawade Special Post For Wife Amruta Deshmukh
Prasad Jawade Special Post For Wife Amruta DeshmukhSaam Tv

Prasad Jawade Special Post For Wife Amruta Deshmukh

‘बिग बॉस मराठी ४’च्या माध्यमातून अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे प्रकाशझोतात आले होते. ‘बिग बॉस मराठी ४’ च्या घरातून बाहेर आल्यानंतर काही दिवसांनंतर या कपलने प्रेमाची कबुली देत साखरपुडा केला. त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये या कपलने लग्नगाठ देखील बांधली.

सध्या हे कपल आपआपल्या प्रोजेक्ट्समुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत. नुकतेच ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ पार पडला या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री अमृता देशमुख हिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने प्रसादने बायकोसाठी खास पोस्ट लिहिलीय. (Theater)

Prasad Jawade Special Post For Wife Amruta Deshmukh
Sangeet Manapmaan Motion Poster: गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘संगीत मानापमान’चा मोशन पोस्टर रिलीज, सुबोध भावेची पहिली झलक पाहिलीत का ?

प्रसादने नुकतंच इन्स्टाग्रामवर अमृताचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ चा पुरस्कार स्विकारताना दिसते. याशिवाय अमृताची नाटकाची रिहर्सल, पुरस्कार मिळाल्यानंतर तिने घरच्यांना केलेला भावूक व्हिडीओ कॉल अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. प्रसादने पोस्टमध्ये लिहिलंय की, “अमृता आणि ‘नियम व अटी लागू...’ ह्या जोडगोळीचा प्रवास मी खुप सुरवातीपासून आणि जवळून पाहिलाय... तालमीच्या वेळेस घर शोधण्यापासून ते प्रत्येक दौऱ्यावर जाताना घर सोडतानाचा क्षण अगदी नीट लक्षात आहे...” (Social Media)

प्रसादने पुढे पोस्टमध्ये लिहिलंय की, “माझी बायको उत्तम अभिनेत्री असली पाहिजे, असं एका interview मध्ये मजेमजेत बोललो आणि अमृताने ते फारच seriously घेतलं... haha! नाही पण... तिला जे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा award मिळालय ते तिच्या उत्तम अभिनयाबरोबरच... शिस्त, चिकाटी आणि प्रामाणिकपणाबद्दल पण मिळालंय असही वाटतं... अमृता I am really really proud of you, you have brought tears in my eyes, this award will always hold a special place in our life. I lovee you a lotttt bubz”

(Marathi Actress)

Prasad Jawade Special Post For Wife Amruta Deshmukh
Hoy Maharaja Film Announcement: गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दगडुने केली नव्या प्रोजेक्टची घोषणा, 'होय महाराजा'चं मोशन पोस्टर रिलीज

प्रसाद आणि अमृताच्या कामाबद्दल सांगायचे तर, अमृता पेशाने रेडिओ जॉकी (RJ) असून सध्या ती ‘नियम व अटी लागू...’ या नाटकाच्या प्रयोगामध्ये अभिनेत्री व्यग्र आहे. सध्या ह्या नाटकाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रसाद जवादे पेशाने अभिनेता आहे. त्याने मालिकेतून आणि चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन केले. प्रसाद सध्या झी मराठीवरील ‘पारू’ या मालिकेतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. (Entertainment News)

Prasad Jawade Special Post For Wife Amruta Deshmukh
Divyendu Sharma Quit Mirzapur 3: ‘मिर्झापूर ३’मध्ये मुन्ना भाई दिसणार नाही, खुद्द अभिनेत्यानेच दिलं स्पष्टीकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com