Divyendu Sharma Quit Mirzapur 3: ‘मिर्झापूर ३’मध्ये मुन्ना भाई दिसणार नाही, खुद्द अभिनेत्यानेच दिलं स्पष्टीकरण

Mirzapur 3 Latest Update: काही दिवसांपूर्वीच ‘मिर्झापूर ३’ची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून दिव्येंदूच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले. त्या सर्वांबद्दल अभिनेत्याने मुलाखत दिली. यामध्ये अभिनेत्याने आपल्या भूमिकेविषयी सांगितले.
Actor Divyendu Sharma Confirm Is Not Part Of Mirzapur 3
Actor Divyendu Sharma Confirm Is Not Part Of Mirzapur 3Saam Tv

Actor Divyendu Sharma Confirm Is Not Part Of Mirzapur 3

सध्या प्रेक्षकांचा ओटीटीवरील कल सर्वाधिक वाढलाय. प्रेक्षक मनोरंजनाचं साधन निवडण्यासाठी ओटीटीलाच सर्वाधिक पसंदी देतात. ओटीटीवर सर्वाधिक गाजलेली वेबसीरीज म्हणजे 'मिर्झापूर'. 'मिर्झापूर' आणि 'मिर्झापूर २' या वेबसिरीजनंतर आता सगळ्यांची प्रतिक्षा आहे ती 'मिर्झापूर ३'ची. (Bollywood)

Actor Divyendu Sharma Confirm Is Not Part Of Mirzapur 3
Swara Bhaskar Birthday: स्वरा- फहदची नेमकी लव्हस्टोरी कशी होती ?, खुद्द अभिनेत्रीने सांगितला किस्सा

'मिर्झापूर सीझन ३' बद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. त्या संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. वेबसीरीजमध्ये मुन्नाभाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दिव्येंदू शर्माचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. (Web Series)

काही दिवसांपूर्वीच ‘मिर्झापूर ३’ची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून दिव्येंदूच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले. त्या सर्वांबद्दल अभिनेत्याने एका टॉक शोमध्ये मुलाखत दिली. यामध्ये अभिनेत्याने ‘मिर्झापूर ३’ नसणार याबद्दल सांगितले. वेबसीरीजमध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे त्याच्या खासगी जीवनामध्ये त्याच्यावर नकारात्मक परिणाम झाल्याचे त्याने सांगितलं. (OTT)

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत दिव्येंदू म्हणाला, मी ‘मिर्झापूर ३’ मध्ये दिसणार नाही. मी आता या वेबसीरीजचा भाग नसणार आहे. मी ज्यावेळी मुन्नाभाईचे पात्र साकारत होतो, त्यावेळी त्याचा परिणाम माझ्या व्यक्तिमत्त्वावर खूप झाला. आपण एखाद्या व्यक्तिरेखेमध्ये खोलवर जाण्याचं फार समर्थन केलं नाही पाहिजे. कारण ते सोपं नसतं. कधीकधी माझ्यासाठी ती गोष्ट खूपच नकारात्मक ठरायची. मुन्ना भैय्याचे पात्र साकारताना अनेकदा गुदमरल्यासारखे वाटायचे. हे इतकं अवघड असतं की कळतंही नाही की आपण त्या झोनमध्ये किती गेलो आहोत. ज्यावेळी त्या विशिष्ट झोनमधून आपण बाहेर पडतो, त्यावेळीच ती बाब आपल्यासाठी किती नकारात्मक होती, हे कळतं.” (Bollywood News)

Actor Divyendu Sharma Confirm Is Not Part Of Mirzapur 3
Jaya Bachchan Birthday: लंडनला जाण्यासाठी बिग बींनी मान्य केली वडिलांची अट; नंतर २४ तासांत जया बच्चन यांच्याशी लग्न, जाणून घ्या हटके लव्हस्टोरी

पॉलिटिकल क्राइम थ्रिलर आणि सस्पेन्स कथानक असलेल्या ‘मिर्झापूर’ वेबसीरिजचा पहिला सीझन २०१८ मध्ये रिलीज झाला होता. प्रेक्षकांच्या मागणीनंतर आणि मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर २०२० मध्ये या वेबसीरिजचा हा दुसरा सीझन रिलीज झाला. आता चाहत्यांना तिसऱ्या सीझनची उत्सुकता आहे. ‘मिर्झापूर’ आणि ‘मिर्झापूर २’ मध्ये प्रमुख भूमिकेत, कुलभूषण खरबंदा, पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विक्रांत मेस्सी, दिवेंद्रू शर्मा, रसिका दुग्गल, राजेश तेलंग, शीबा चड्ढा, हर्षिता गौर, श्रिया पिळगावकर, विजय वर्मा, लिलीपुटसह आदी कलाकार आहेत. आता तिसऱ्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत कोण कोणते नवीन चेहरे दिसणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Entertainment News)

Actor Divyendu Sharma Confirm Is Not Part Of Mirzapur 3
Sanjay Dutt: 'मी राजकारणात येईल तेव्हा...', लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर संजय दत्तने सोडलं मौन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com