
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शिवानीच्या घरी सध्या लगीनघाईला सुरूवात झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवानीने चाहत्यांना माहिती दिली आहे. मराठमोळ्या अनेक अभिनेत्री नुकतंच लग्नबंधनात अडकल्या आहेत. यामुळेच आता शिवानी सोनारच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. कोण आहे शिवानी सोनारचा होणारा नवरा ते देखील जाणून घेऊया.
शिवानी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने, लग्नासाठी खास पणजीची नथ तिने पुन्हा एकदा बनवून घेतली आहे. याचा व्हिडीओ देखील तिने बनवला आहे. व्हिडीओला शिवानीने, "दागिने ही स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात जवळची गोष्ट आणि एखादा दागिना घडवतं असताना तो पाहणं याच्या सारखं दुसरं सुख नाही... त्यात नथ म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय... पण ही नथ माझ्यासाठी जास्त खास आहे... कारण ही नथ माझ्या आजीच्या आईची... तिने तिच्या लग्नात घातली... मग माझ्या आजीने तिच्या लग्नात आता मी माझ्या लग्नात ही नथ घालणार... थोडी जुनी झाली होती त्यामुळे नव्याने विणून घ्यावी लागली"
“आडनाव सोनार असलं तरी आजपर्यंत दागिना घडताना पाहिलं नव्हतं… यानिमित्ताने तेही पूर्ण झालं…माझ्यासाठी सगळ्यात जास्त स्पेशल दागिना आहे हा…कारण अंकईकर आजोबांनी खूप प्रेमाने विणलेली नथ आहे ही…यात पणजी आजीचे आणि माझ्या आजीचे आशीर्वाद आहेत…आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही नथ घडत असताना आई ज्या अभिमानाने माझ्याकडे बघत होती… ती नजर मी कधीच नाही विसरू शकणार…आई माझ्याकडे अशी बघत होती जणू तिला कोणीतरी बेस्ट आई असं अवॉर्ड दिलंय…बाकी…जुने आणि पारंपरिक दागिने घालून मिरवायची मजा काहीतरी वेगळीच आहे,” अशी सुंदर पोस्ट शिवानी सोनारने लिहिली आहे.
शिवानी सोनार हा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच ९ एप्रिलला साखरपुडा केला होता. सोशल मीडियावर शिवानीच्या साखपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते. शिवानी सोनार अंबर गणपुळेशी लग्नबंधनात अडकणार आहे. अंबर गणपुळे हा अभिनेता आहे त्याने अनेक मराठी मालिकेत काम केले आहे. 'दुर्गा' 'रंग माझा वेगळा', 'लोकमान्य' या मालिकेत काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.