Bihar Government Formation Saam Tv
देश विदेश

Bihar Government Formation: नितीश कुमार मुख्यमंत्री, भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'ही' २ नावं निश्चित

Bihar Cabinet: बिहारमध्ये लवकरच एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. उद्या नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर भापकडून उमुख्यमंत्रिपदासाठी दोन जणांची नावं निश्चित करण्यात आली आहेत.

Priya More

Summary -

  • बिहारमध्ये नितीश कुमार १० व्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत

  • भाजपाने उपमुख्यमंत्रीपदासाठी सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचीच निवड केली

  • २० नोव्हेंबर २०२५ रोजी गांधी मैदानात शपथविधी होईल

बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आणि विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली. नितीश कुमार हे १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. तर भाजपने बिहारमध्ये कोणताच बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे आधीप्रमाणेच उपमुख्यमंत्री राहणार आहेत. उद्या शपथविधी सोहळा होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नितीश कुमार हे २० नोव्हेंबरला बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्रिदाची शपथ घेतील. उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून अनेक नावांची चर्चा होती. सम्राट चौधरी, मंगल पांडे, दिलीप जयस्वाल आणि विजय कुमार सिन्हा हे उपमुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. विजय सिन्हा यांचे नाव सभापती आणि प्रदेशाध्यक्ष पदासाठी देखील घेतले जात होते. पण भाजपने उपमुख्यमंत्रिपदासाठी सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांची निवड केली आहे.

आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची नेतेपदी निवड झाली. तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड झाली. दोघेही उपमुख्यमंत्री होणार आहेत. सम्राट पूर्वी नेतेपदावर होते आणि विजय सिन्हा उपनेतेपदावरच होते. त्यामुळे सत्तेत परतल्यानंतर भाजपने कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नितीश कुमार यांची जेडीयू विधिमंडळ पक्षनेतेपदी पुन्हा निवड झाली आहे आणि ते गुरुवारी सकाळी ११:३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे देखील गांधी मैदानात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. सध्या अशी चर्चा आहे की, गांधी मैदानात एकूण २० मंत्री शपथ घेऊ शकतात. यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांमधील जुने आणि नवीन दोन्ही चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुरक्षा दलाची मोठी कारवाई; सलमान खानला धमकावणाऱ्या बिश्नोईच्या मुसक्या आवळल्या, मोठ्या बंदोबस्तात भारतात आणलं

तुझ्यात दम असेल तर मैदानात ये! एका मिनिटात सरळ करेल; चंद्रकांत खैरेंचा रोख कुणाकडे? VIDEO

Kalyan : काळू नदीचा जीव कोण घेतोय? कल्याणमध्ये दिवसाढवळ्या वाळू उपसा, तरी प्रशासन गप्प?

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, ऊसतोड कामगाराचं भयंकर कृत्य

Tina Dabi: राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेल्या टीना डाबी कोण आहेत?

SCROLL FOR NEXT