Soan Papdi Recipe: सणासुदीला घरच्या घरी करा स्वादिष्ट सोन पापडी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

सोन पापडी बनवण्यासाठी बेसन, मैदा, साखर, तूप, पाणी, वेलची पूड आणि सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप लागतात.

Soan Papdi

साखरेचा पाक तयार करा

एका कढईत साखर आणि पाणी घालून मध्यम आचेवर उकळवा. थोडा घट्ट एकतारी पाक तयार होईपर्यंत तो शिजवा.

Soan Papdi Recipe

बेसन आणि मैदा भाजून घ्या

दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बेसन आणि मैदा घाला. मंद आचेवर हलवत हलवत ते हलके सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

Soan Papdi Recipe

पाक आणि मिश्रण एकत्र करा

तयार साखरेच्या पाकात भाजलेले बेसन-मैद्याचे मिश्रण घालून चांगले मिसळा. यामध्ये वेलची पूड घालून सुगंध वाढवा.

Soan Papdi Recipe

मिश्रण घट्ट होऊ द्या

मिश्रण थोडे घट्ट होऊ लागल्यावर ते सतत हलवत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.

Soan Papdi Recipe

ट्रे मध्ये पसरवा

तूप लावलेल्या ट्रे किंवा ताटात हे मिश्रण पसरवा. वरून बदाम-पिस्त्याचे काप घालून हलके दाबा.

Soan Papdi Recipe

तुकडे करून सर्व्ह करा

मिश्रण थंड झाल्यावर चौकोनी किंवा डायमंड आकाराचे तुकडे करा. अशा प्रकारे घरी बनलेली कुरकुरीत आणि स्वादिष्ट सोन पापडी तयार होते.

Soan Papdi Recipe

Skin Care: त्वचेवरील घाण, डार्क पॅच आणि तेल काढून टाकण्यासाठी लावा घरी तयार होणारा 'हा' पॅक

Face care | Saam Tv
येथे क्लिक करा