MINOR GIRL STABBED TO DEATH BY COUSIN IN SHEIKHPURA FOR REFUSING MARRIAGE 
देश विदेश

Crime News: धक्कादायक! लग्नासाठी मुलीने दिला नकार, चुलत भावाला राग अनावर, रस्त्यावरच बहि‍णीवर केले चाकूने सपासप वार

Bihar Crime News: बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा तिच्याच मामाच्या मुलाने लग्नास नकार दिल्यामुळे चाकूने भोसकून खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Dhanshri Shintre

  • शेखपुरात अल्पवयीन मुलीचा मामाच्या मुलाने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे खून केला.

  • आरोपीने दिवसाढवळ्या चाकूने मुलीवर तीन वार केले.

  • नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला असून गावात तणावाचे वातावरण आहे.

बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीच्या खूनाच्या घटनेने परिसर हादरला आहे. शेखपुरासराय बाजारपेठेतील गावात बुधवारी दिवसाढवळ्या तिची मुलीच्या मामाच्या मुलाने चाकूने भोसकून हत्या केली. आरोपीने तिच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. परंतु तिने नकार दिल्यावर रागाच्या भरात हे अमानुष कृत्य करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आपल्या मोठ्या बहिणी आणि धाकट्या भावासोबत गावातील रस्त्यावरून जात होती. त्याच वेळी आरोपीने अचानक तिला अडवून जबरदस्तीने लग्नाचा प्रस्ताव मांडला. तरुणीने विरोध करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने तिचा पाठलाग करून पकडले आणि चाकूने तिच्या छातीवर सलग तीन वेळा वार केले. गंभीर अवस्थेत ती जमिनीवर कोसळली. रक्ताच्या थाऱ्या पाहून परिसरात आरडाओरड झाली आणि नागरिकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडून बेदम मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच शेखपुरासराय पोलीस तात्काळ पोहोचले आणि जमावाच्या तावडीतून आरोपीला सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, जखमी मुलीला नागरिक आणि तिच्या कुटुंबीयांनी शेखपुरासराय रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

या प्रकरणाची माहिती देताना एसडीपीओ डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले की, आरोपी हा पीडित मुलीचा मामा असून त्याला अटक करण्यात आली आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम रुग्णालयात पार पडले आहे. पोलिसांनी घटनेचे कारण प्राथमिक स्वरूपात लग्नास नकार दिल्याने झालेली वैयक्तिक वैरभावना असल्याचे नमूद केले आहे.

ही घटना घडल्याने संपूर्ण गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी या निर्दयी कृत्याचा तीव्र निषेध केला असून प्रशासनाने आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी परिसरात शांती राखण्यासाठी सुरक्षा वाढवली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT