Bengaluru Stampede Saam Tv
देश विदेश

Bengaluru Stampede: २ लाख लोक येण्याची शक्यता, पण आले ६ लाख; RCB च्या विजय रॅलीदरम्यान काय चूक झाली?

Bengaluru Stampede Update: RCB च्या विजय रॅलीदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला. तर २५ पेक्षा अधिक जखमी झाले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

Priya More

आयपीएल २०२५ ची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने जिंकली. ही टीम आज बंगळुरूमध्ये दाखल झाली. या सर्व टीमच्या खेळाडूंचा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार करण्यात आला. तसंच यावेळी विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीला गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ११ जणांनी आपला जीव गमावला. तर २५ हून अधिक जण चेंगराचेंगरीमध्ये जखमी झाले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

या विजयी रॅलीमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रशासनाने २ लाख लोकांच्या गर्दीचा अंदाज लावला होता. पण मैदानाच्या आत आणि बाहेर जवळपास ६ लाख लोकं जमले होते. ३२ हजार क्षमतेच्या चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये जवळपास १ लाख लोकं घुसल्याची माहिती समोर आली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवणं पोलिसांना कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. यावेळी अनेक जणांचा श्वास कोडला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. यावेळी गर्दीने त्यांना पायाखाली तुडवलं.

स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक दरवाजे होते पण गर्दीचा संपूर्ण ताण एकाच दरवाज्यावर आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला.पोलिस आणि स्टेडियम प्रशासनाने लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला ही लोकं कोणाचेही ऐकत नव्हते. अनेकांनी स्टेडिअमच्या भिंती ओलांडून आतमध्ये प्रवेश केला. गेटवर झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'लोकांना कोणत्याही परिस्थितीत आत जायचे होते. त्यांना ना गेट दिसला ना गार्ड. ते फक्त पुढे जात राहिले.' स्थानिक लोकांनी सांगितले की, 'या गर्दीनंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.' तर दुसरीकडे, स्टेडिअमबाहेरील वातावरण खूपच उत्साही होते. अनेक जण ढोल-ताशांच्या तालावर नाचत होते, फटाके फोडत होते, जयघोष करत होते. पण गर्दी वाढत जाऊन नियंत्रणाबाहेर गेल्याने आनंदाचे रूपांतर किंचाळ्या, रडण्यात आणि ओरड्यात झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT