Bengaluru Stampede : बेंगळुरुत मृत्यूचं तांडव! चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू; तरीही RCBचं सेलिब्रेशन सुरु, व्हिडिओ समोर

Bengaluru Stampede update : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत चाहत्यांचा मृत्यू जात असताना आरसीबीचं सेलिब्रेशन सुरु होतं.
Stampede in Bengaluru
Bengaluru StampedeSaam tv
Published On

बेंगळुरूत स्टेडियमबाहेर गर्दीच्या रेट्यामुळं झालेल्या चेंगराचेंगरीत १० जणांचा जीव गेला. लाखमोलाचे जीव गेले, पण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयाचं सेलिब्रेशन थांबलं नाही. आरसीबी जिंकल्यानंतर संघाच्या धुरंधरांनी ट्रॉफी उंचावताना प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळं आम्हाला जिंकण्याचं बळ मिळालं असं छातीठोकपणे सांगितलं. पण याच प्रेक्षकांचा जेव्हा स्टेडियमबाहेर बळी गेला, तेव्हा त्याचं साधं दुःखही व्यक्त न करता, उलट सेलिब्रेशनमध्ये धन्यता मानली. त्यामुळं एका वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

कर्नाटकातील बेंगळुरूत आरसीबीच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरीमुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळाला. बेंगळुरूतील चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. स्टेडियममधील बाहेरील गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. स्टेडियमबाहेर चाहत्यांचा बळी जात असताना आरसीबी संघाचं सेलिब्रेशन सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. मृत्यूच्या तांडवानंतरही सुरु असलेल्या सेलिब्रेशनवर टीकेचे झोड उठली आहे.

Stampede in Bengaluru
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणाला नवं वळण; आत्महत्येचं रहस्य उलगडणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयाची रॅली आयोजित केली होती. या रॅलीसाठी मोठ्या संख्येने लोक स्टेडियम बाहेर पोहोचले होते. स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने आलेल्या चाहत्यांची चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत अनेक जण बेशुद्ध झाले. चाहत्यांनी एकमेकांना पायाखाली तुडवले. तर ३० हून अधिक जण जखमी झाले. या जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Stampede in Bengaluru
Kalyan News : दुर्गाडी किल्ल्याची भिंत कोसळली, शिंदे सेनेचा आमदार भडकला, ठेकेदाराला दिला इशारा

चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरुच्या बॉरिंग रुग्णालयात ६ जणांच्या मृत्यूला दुजोरा देण्यात आला आहे. तर वैदेही रुग्णालयात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या व्यतिरिक्त अनेक लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ५० हून अधिक जण जखमी झाल्याची मिळत आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com