Kalyan News : दुर्गाडी किल्ल्याची भिंत कोसळली, शिंदे सेनेचा आमदार भडकला, ठेकेदाराला दिला इशारा

Kalyan durgadi fort news : दुर्गाडी किल्ल्याची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शिंदे सेनेचा आमदार ठेकेदारावर भडकला.
Durgadi
kalyanSaam tv
Published On

कल्याण : कल्याणमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याणमधाील एका तासाच्या मुसळधार पावसाने नागरिकांना झोडपून काढलं आहे. या पावसामुळे कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली आहे. किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळल्याने शिंदे सेनेचा आमदार भडकला. या आमदाराने थेट ठेकेदारावर आगपाखड केली.

Durgadi
Maharashtra Politics : रायगडमध्ये महायुतीत 'बिघाडी'; तटकरे- गोगावलेंमध्ये पुन्हा जुंपली, पाहा व्हिडिओ

कल्याणमध्ये शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा संरक्षक कठडा कोसळल्याची घटना घडली आहे. या किल्ल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखभाल दुरुस्तीचं काम सुरु आहे. या घटनेनंतर शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठेकेदारावर आगपाखड केली आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप केला आहे. तसेच संपूर्ण भिंत निष्कासित करण्याची मागणी आमदार भोईर यांनी केली.

Durgadi
Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतो, पण...'; मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला पुढील प्लान

आमदार विश्वनाथ भोईर यांनी भ्रष्टाचाराही आरोप केला. किल्ल्याचं नित्कृष्ट दर्जाचे काम करण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्त्व विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप आमदारांनी केला. दुर्गाडी किल्ला आहे हा कल्याणकरांची अस्मिता आहे. या किल्ल्याच्या संबंधित ठेकेदाराने कामात भ्रष्टाचार केला आहे. तो संध्याकाळपर्यंत येथे आला नाही, तर या ठेकेदाराची वरात काढणार, असा इशारा आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला.

Durgadi
Akola Crime : जामिनावर बाहेर आला अन् इमारतीतील इंजिनीअरशी बिनसलं; रागात धारदार शस्त्राने वार करत संपवलं

नेमकं काय घडलं?

ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला ही कल्याण शहराची शान आणि प्राचीन वैभव आहे. गेल्या काही वर्षांपासून किल्ल्याचे बुरुज आणि भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर किल्ले दुर्गाडीचे देखभाल दुरुस्तीची मागणी केली जात होती. पुरातत्व विभाग आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून या किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये किल्ल्याचे बुरुस किल्ल्याचे संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असतानाच आज बुधवारी पहाटेच्या सुमारास या किल्ल्याच्या गोविंदवाडी बायपास दिशेला असलेल्या संरक्षण भिंतीचा भला मोठा भाग अचानक कोसळला. त्याच पाठोपाठ सकाळच्या सुमारास किल्ल्याचा कठडा देखील कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com