Maharashtra Politics : रायगडमध्ये महायुतीत 'बिघाडी'; तटकरे- गोगावलेंमध्ये पुन्हा जुंपली, पाहा व्हिडिओ

Raigad Politics : रायगडच्या पालकमंत्री पदावरून आधीच तटकरे आणि गोगावले यांच्यात वाद सुरु आहेत. अशातच रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने आलेत? शिवसेना- राष्ट्रवादीत वादाची नवी ठिणगी पडलीय. नेमकं प्रकरण काय? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून...
mahayuti News
mahayutiSaam tv
Published On

रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद पाच महिने उलटूनही संपता संपत नाही. काही दिवसांपूर्वी भरसभेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी आमदार गोगावलेंची नॅपकिन दाखवत नक्कल केली. ही नक्कल झोंबलेल्या गोगावले समर्थकांनी गोगावलेंच्या वाढदिवसाला थेट उपस्थितांना नॅपकिनचं वाटप करून तटकरेंना डिवचलयं.

mahayuti News
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; मराठवाड्यातील बडा नेता अजित पवारांना साथ देणार

आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात वाद सुरु आहे. अशातच नॅपकिन स्टाईलमुळे सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात वादाची ठिणगी पडली. हे कमी की काय म्हणून आता महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी नकोच अशी थेट भूमिका शिंदे सेनेच्या आमदारांनी घेतलीय.

mahayuti News
Pune Koyta Gang : आम्हीच इथले भाई, पुण्यात कोयता गँगचा राडा; भर रस्त्यात कोयते उगारुन लोकांवर दगडफेक

शिवसेनेच्या फुटीच्या आधीपासूनच रायगड जिल्हयातली ही धुसफुस सुरू होती. मात्र आता शिंदे सेनेचे आमदार राष्ट्रवादीविरोधात अधिकच आक्रमक झालेत . याचाच परिणाम म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंची शिवसेना असं चित्र पाहयाला मिळू शकतं. त्यामुळे महायुतीतील ही बिघाडी कुणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com