Raigad Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 1 ट्रक, 3 कार आणि ३ बसेस एकमेकांवर आदळल्या

Raigad Accident News: 1 ट्रक 3 कार आणि तीन बसेसचे अपघातात मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले आहेत.
Raigad Accident
Raigad Accident Newssaam tv
Published On

सचिन कदम, साम प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय. सात वाहने एकमेकांवर आदळली आहेत. यात ४ ते ५ जण जखमी झाले असून दोन महिलांचा मृत्यू झालाय. या महामार्गावर एक ट्रक , तीन कार, आणि ३ बसेस एकमेकांवर आदळली आहेत. ट्रकने दोन कारला उडवलं. यात एका अर्टीगाचा चक्काचूर तर आय 10 कार दुभाजक आणि ट्रकमध्ये अडकली.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील मुंबई लेनवरील खपोली हद्दीत हा भीषण अपघात झाला. या विचित्र अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. जखमींवर एमजीएम हॉस्पिटल, खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झालाय. अश्विनी अक्षय हळदणकर आणि श्रेया संतोष अवताडे अशी मृत महिलांची नावे आहेत. तर ४ ते ५ जण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळाताच महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आय आर बी, हेल्प फाउंडेशनच्या स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले आहे.

Raigad Accident
Boat Accident : आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस, बोटीने समुद्रात फिरायला गेले असता अपघात; ८ वर्षीय लेकीवर...

मध्यरात्री काळाचा घाला, अपघातात माय-लेकीचा जागेवर मृत्यू

जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात मायलेकींचा दुर्देवी मृत्यू झाला. ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता. अंजना पुरुषोत्तम सापनर वय ३० व अनुसया पुरुषोत्तम सापनर वय १४ असं मयत मायलेकींची नावे आहेत. बीड वरून जालना कडे येणारी ट्रॅव्हल आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. गुरुवारच्या मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.जालन्यातील सुखापुरी फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com