
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळच्या पाटील कुटुंबाचा लग्नाचा वाढदिवस साजरा करताना मोठा अपघात झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात त्यांची ८ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
२० मे रोजी संध्याकाळी बेलापूर जेट्टीहून 'प्लोडाइन क्रूझ' या फेरीबोटीने समुद्रफेरीस गेलेल्या प्रविण पाटील यांच्या आठ वर्षांची मुलगी सान्वीवर बोटीतील वॉशबेसिनजवळील काचेचा दरवाजा तुटून कोसळला. या अपघातात सान्वीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, हात आणि पायांवर गंभीर जखमा झाल्या. बोटीत प्राथमिक उपचाराची कोणतीही व्यवस्था नव्हती. बोट किनाऱ्यावर पोहोचायला अर्धा तास लागला आणि रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती. प्रविण पाटील यांनी सान्वीला स्वतः नेरुळच्या अपोलो हॉस्पिटल व नंतर ओजस नर्सिंग होममध्ये दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर पाटील यांनी बोट मालक राजेश नायर याच्याविरोधात एन.आर.आय सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सुरक्षेच्या अनास्थेमुळे गंभीर अपघात झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. सध्या या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी!
दरम्यान, मुंबईच्या लोकलची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या लोकलच्या गर्दीत चढण्यासाठी मुंबईकरांना मोठी कसरत करावी लागते. मुंबईतील घरे महागल्याने अनेकांनी मुंबईलगत असलेल्या ठाणे, डोंबिवली, कर्जत, पनवेल भागात मोठ्या प्रमाणात घरे घेतली आहेत. त्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुढील भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. या भागातील लोकांना प्रवासासाठी लोकल हाच मुख्य पर्याय आहे. या भागातील लोकांना दररोज लोकलमध्ये गर्दीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पनवेल-कर्जतदरम्यान २९ किलोमीटरचा मार्ग तयार केला जाणार आहे. ही मार्गिका लवकरच सेवेत येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा लोकल गर्दीचा ताण कमी होणार आहे.
पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. कर्जत आणि पनवेल शहरांत राहणाऱ्या दररोज मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. यामुळे मध्य रेल्वेने कर्जत-पनवेलदरम्यान चौथी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गिकेसाठी एकूण ४९१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचं ७१ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. या मार्गातील पाच रेल्वे स्टेशनचं कामही वेगाने सुरु आहे. या नव्या मार्गिकेचं संपूर्ण काम वर्षअखेरीस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.