
मुंबईच्या लोकलची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या लोकलच्या गर्दीत चढण्यासाठी मुंबईकरांना मोठी कसरत करावी लागते. मुंबईतील घरे महागल्याने अनेकांनी मुंबईलगत असलेल्या ठाणे, डोंबिवली, कर्जत, पनवेल भागात मोठ्या प्रमाणात घरे घेतली आहेत. त्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुढील भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. या भागातील लोकांना प्रवासासाठी लोकल हाच मुख्य पर्याय आहे. या भागातील लोकांना दररोज लोकलमध्ये गर्दीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पनवेल-कर्जतदरम्यान २९ किलोमीटरचा मार्ग तयार केला जाणार आहे. ही मार्गिका लवकरच सेवेत येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा लोकल गर्दीचा ताण कमी होणार आहे.
पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. कर्जत आणि पनवेल शहरांत राहणाऱ्या दररोज मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. यामुळे मध्य रेल्वेने कर्जत-पनवेलदरम्यान चौथी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गिकेसाठी एकूण ४९१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचं ७१ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. या मार्गातील पाच रेल्वे स्टेशनचं कामही वेगाने सुरु आहे. या नव्या मार्गिकेचं संपूर्ण काम वर्षअखेरीस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आलेल्या कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली. खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी नेरळ, कर्जत रेल्वे स्टेशनला भेट दिली. त्यांनी रेल्वे स्टेशनवरील कामांची माहिती घेतली. दुसरीकडे नेरळ रेल्वे स्टेशन सुधारण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून काम सुरु आहे. त्यातून रेल्वे स्टेशनची सुधारणा केली जात आहे. नेरळ स्टेशनवर दोन लिफ्ट, सरकते जिने, रेल्वे स्टेशनवर बैठक कक्ष, लिफ्ट, पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे विभागात येणाऱ्या रेल्वे स्टेशनला भेट दिली होती. त्यानंतर शुक्रवारी मुंबई विभागात येणाऱ्या कर्जत, नेरळ रेल्वे स्टेशनला भेट दिली. रेल्वे स्टेशन सुधारणा, दर्जेदार कामे करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी वरिष्ठ अभियंता नझीब, व्यवस्थापक अजय कुमार, पी एम प्रकाश, व्ही जी अल्लूरे, एस के यादव, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोषशेठ भोईर, शिवसेना तालुका प्रमुख सुदाम पवळी आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, बारणे म्हणाले, नेरळ ते कर्जतदरम्यान लोकल रेल्वेने प्रवास केला. कर्जत रेल्वे स्टेशनचीही पाहणी केली. तेथील असुविधांची माहिती घेतली. त्या समस्या सोडविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पनवेल ते कर्जत दरम्यान नवीन रेल्वे मार्ग होत आहे. त्यामुळे कर्जत येथे नवीन स्टेशन उभारण्यात येत आहे. आता जुन्या स्टेशवनरुन एक्सप्रेस धावतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनला सुविधा द्याव्यात'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.