Rajendra Supekar : राजेंद्र हगवणेंचे मेहुणे IG सुपेकरांची ऑडिओ क्लिपच ऐकवली, अंजली दमानियांनी केला मोठा गौप्यस्फोट

Rajendra Supekar Audio Clip : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेत लक्ष घातलं असून लवकरच या प्रकरणात मी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी राजेंद्र हगवणेंचे मेहुणे IG जालिंदर सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिपच ऐकवली आहे.
Rajendra Supekar Audio Clip
Rajendra Supekar Audio ClipSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातील विवाहित वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता वैष्णवीचा पती, दीर, सासू-सासरा तसेच नणंद यांना अटक करण्यात आली आहे. ५१ तोळे सोने फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिल्यानंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ काही थांबवला नाही. याच त्रासातून नंतर तिने स्वत:ला संपवलं. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेत लक्ष घातलं असून लवकरच या प्रकरणात मी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी राजेंद्र हगवणेंचे मेहुणे IG जालिंदर सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिपच ऐकवली आहे.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

अंजली दमानिया पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, 'हगवणे कुटुंबातील या सगळ्यांना ताकद का मिळाली? तर यांच्यामागे जालिंदर सुपेकर हे नाव होतं, त्यांच्यामुळे ताकद मिळाली. आता सुद्धा ते सहा ते सात दिवस फरार होते. ते कोणाच्या मदतीने फरार झाले? पहिल्या दिवसापासून मला हेच कळलं की वैष्णवीचे वडील सुद्धा सांगत आहेत की ही आत्महत्या नाही तिचा घात झाला आहे. तेच आता रिमांड कॉपीमध्ये स्पष्ट आलेलं आहे.

Rajendra Supekar Audio Clip
Vaishnavi Hagawane Death : कमरेला पिस्तुल, मित्राच्या खांद्यावर बसून चुम्मा गाण्यावर ठेका; निलेश चव्हाणचा नवा VIDEO व्हायरल

निलेश चव्हाण नाहीतर शशांक याला सुद्धा पिस्तूल मिळाली आणि त्याचं लायसन्स देखील मिळालं. निलेश चव्हाण याला ग्रामीण पातळीवर परवानगी नाकारली होती. पण ती सुपेकर यांनी मिळवून दिली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर आलं आहे की मी ताबडतोब याची चौकशी करतो. मी आधी त्यांनाही ऑडिओ क्लिप दिली, आणि त्यानंतर मी ही पत्रकार परिषद घेत आहे. ते जे म्हणतात की आमचं हगवणे कुटुंबाशी दूरचे संबंध होते तर तसं नाही ते जवळचे त्यांचे संबंध होते. जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्ये ५०० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. नाशिक आणि कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत. कराडला सुद्धा जे समर्थन मिळालं ते सुद्धा यांच्यामुळेच मिळालं.

ऑडिओ क्लिप

५०० कोटींच्या घोटाळ्यामध्ये माझं नाव वगळून दुसऱ्या अधिकाऱ्यांचे नावं घाल. अमिताभ गुप्ता यांचं नाव घाल, असं सुपेकर म्हणताना ऐकू येत आहे. ही ऑडिओ क्लिप मी काल मुख्यमंत्र्यांना दिली, असंही दमानिया यांनी यावेळी सांगितलं आहे.

Rajendra Supekar Audio Clip
VIDEO : माझं दुसऱ्यावर प्रेम आहे; लग्नाच्यावेळी बॉयफ्रेंडचा फोन, नवरीनं अक्षदा पडण्यापूर्वी मोडलं लग्न, बिचारा नवरदेव...

जालिंदर सुपेकर काय म्हणाले?

पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणीचा तपास सीआयडी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अशोक सादरे यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलेला कोणताही प्रकार हा घडलेला नसल्याबाबत त्यांनी न्यायालयाला अहवाल सादर केला होता. सदर अहवालातील गोष्टींची न्यायालयाने ही पडताळणी करून तो अहवाल बरोबर असल्याबाबत खात्री करून स्वीकारला आहे . त्याबाबत आमचा कोणताही दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे.

कारागृह वस्तू खरेदीत ५०० कोटींचा भ्रष्टाचार आरोपाबाबत

तुरुंग विभागात खरेदीमध्ये ५०० कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार झाला असा आरोप होत आहे, सदर खरेदी हीच मुळात ३५० कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार होऊ शकत नाही. तसेच सदर खरेदी ही शासनाने नेमलेल्या राज्य खरेदी समितीमार्फत होत असते. सदर समितीचा मी फक्त एक सदस्य आहे. कमिटीचे इतर सदस्य हे तुरुंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतात. हे अधिकारी आमच्या पेक्षाही वरिष्ठ स्तरावरील असतात. सर्व निर्णय हे पूर्ण कमिटी घेत असते. मला एकट्याला त्यामध्ये स्वतंत्र अधिकार नाही. त्यामुळे त्याबाबत माझ्यावर लावलेले पूर्ण आरोप हे पूर्णतः खोटे आहेत. सदर कमिटीमार्फत सदरची खरेदी शासकीय नियमाप्रमाणे झालेली आहे व तसा अहवाल शासनाला पाठवण्यात आलेला आहे .

मागील २ वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर आहे. त्यामुळे माझा कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही. कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक हा माझ्या अधिपत्याखाली नाही. त्यामुळे मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही. हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही. हगवणे कुटुंबाने केलेल्या अमानवीय अपराधाशी माझा कुठलाही संबंध नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे. कृपया त्यांच्या कृत्याशी माझा संबंध जोडू नये ही माझी नम्र विनंती, असं जालिंदर सुपेकरांनी म्हटलं आहे.

Rajendra Supekar Audio Clip
Jalgaon Crime: काठीनं फोडलं, दगडानं ठेचलं; अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूचं गूढ वाढलं; जळगावात 'त्या' रात्री काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com