
हासन : कुटुंबीय, आप्तेष्टांसह सर्वजण लग्नाला उपस्थित होते. ते एक भव्य लग्न होतं. लग्नाचे विधी सुरू झाले होते. मंत्रोच्चार सुरू होते. मंगलाष्टके पडण्याची वेळ आली असतानाच नवरीने लग्न करण्यास नकार दिल्याची घटना हासनमध्ये घडली आहे. तिला मंगलाष्टके पडण्याच्या काही क्षण आधी प्रियकराचा फोन आला. वेळ कमी असतानाही नवरीनं लग्न करण्यास नकार दिला. मुलीच्या पालकांनी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. नवरदेवाने विनंती केली. पण कोणाचेही ऐकत नसलेली नवरी लग्नमंडपातून बाहेर पडली.
हासन तालुक्यातील बूवनहळ्ळी गावातील पल्लवी आणि आलूर तालुक्यातील वेणुगोपाल जी यांचं लग्न ठरलं होतं. हासन शहरातील श्री आदिचुंचनगिरी कल्याण मंडपात लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती. शुभमुहूर्तावर लग्नाचे विधी सुरू झाले. भव्य लग्नासाठी कुटुंबीयांनी सर्व व्यवस्था केली होती. हजाराहून अधिक आप्तेष्ट, कुटुंबीय आले होते. पण अखेरच्या क्षणी लग्न थांबल्याने एकच खळबळ उडाली.
लग्नमंडपातून निघून गेलेली नवरी
लग्न करायचं नाही म्हणत लग्नमंडपातून बाहेर पडलेली नवरी थेट घरी निघून गेली. त्यानंतर दोन्ही कुटुंबात मोठा वाद झाला. लग्नघर रणांगण झालं. पोलीस पाटील आणि शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती शांत केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.