
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. हेच नाही तर मृत्यूपूर्वी तिला पती शंशाक याने पाईपाने बेदम मारहाण केल्याचं स्पष्ट झालंय. हा पाईप देखील पोलिसांनी जप्त केलाय. सतत पैशांसाठी तिच्यावर सासरच्या लोकांकडून दबाव होता. हगवणे कुटुंबाच्या मोठ्या सुनेनं देखील धक्कादायक खुलासे केले आहेत. आज कोर्टात सासरे राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे यांना हजर करण्यात आलं. यादरम्यान कोर्टात रिमांड रिपोर्टमध्ये १२ महत्वाचे मुद्दे पुढे आले आहेत.
रिमांड रिपोर्टमध्ये १२ महत्वाचे मुद्दे
१. दाखल गुन्हा हा महिला अत्याचाराविरुध्दचा व गंभीर स्वरुपाचा आहे.
२. यातील मयत महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यावरुन फिर्यादी यांनी सदर महिलेची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच शवविच्छेदनानंतर मूत्यूचं कारण death due to ligature compression of neck, with evidence of multiple blunt injuries over body, viscera and articles preserved for chemical analysis असं दिलं असून त्याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त करुन त्याबाबत तपास करणे कामी.
३. यातील मयताच्या इन्क्वेस्ट पंचनाम्यान्वये दिसून आलेल्या जखमांचं वर्णन पाहता मयतास वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याचं दिसून येत आहे. त्यापैकी एक प्लॅस्टीक पाईप हे आरोपी क्र. १ याने दिलेल्या निवेदनावरुन हस्तगत करण्यात आलं असून आरोपी क्र. ४ व ५ यांनी सुध्दा मयत महिलेस मारहाण केली असून त्याबाबत तपास करणे कामी.
४. नमुद गुन्ह्यातील अटक आरोपींनी ज्याअर्थी यातील मयत विवाहीतेचा पैशासाठी छळ केला होता, त्याबाबत अटक आरोपी क्र. ४ व ५ यांच्याकडे तपास करणे कामी.
५. नमुद आरोपी क्र. १ यांच्याकडून लग्नाच्या वेळी हूंडा म्हणून देण्यात आलेली फॉरच्युनर कार आणि ॲक्टीवा मोपेड गाडी जप्त केली असून आणखी कोणती गाडी अगर किंमती वस्तू हूंडा म्हणून दिलं आहे काय याबाबत आरोपी क्र. ४ व ५ यांचेकडे तपास करणे कामी.
६. यातील मयत महिलेला स्त्रीधन म्हणून दिलेले ५१ तोळे सोने हे आरोपींनी फेडरेल बैंकेत तारण म्हणून कोणत्या कारणासाठी ठेवले आहे तसेच त्यासाठी मयत महिला हिची परवानगीने ठेवले किंवा कसे तसेच ते सोने तारण ठेवण्यासाठी तिचा छळ करुन तिच्याकडून सोने घेतले किंवा कसे तसेच सोने तारण ठेवण्यामागे आरोपींचा काय उद्देश होता याबाबत तपास करणे कामी.
७. यातील पाहिजे आरोपी राजेंद्र हगवणे यांचे कार्यालय पत्ता भुकुम, ता. मुळशी, जि.पुणे याचे इंटेरियर डिझाईनचे काम महेश परांडे यांनी केले असून त्याचे पैसे यातील आरोपींनी फिर्यादी यांना देण्यास भाग पाडले आहे. याबाबत आरोपी क. ४ व ५ यांचेकडे तपास करणे कामी.
८.यातील आरोपी क्र. ४ व ५ यांनी गुन्हा केला पासून फरार होते त्या कालावधीत त्यांना कोणी मदत केली आहे अगर कसे ? याबाबत तपास करणे कामी.
९. यातील आरोपी क्र. ४ व ५ यांनी पळून जाण्यासाठी कोणती वाहने वापरलेली आहेत त्याबाबत तपास करणे कामी.
१०. याती आरोपी क्र. ४ व ५ यांना फरार कालावधीमध्ये कोणी आर्थिक मदत केली आहे काय याबाबत तपास करणे कामी.
११. यातील आरोपी क्र. ४ व ५ हे गुन्हा दाखल झाल्यानंतर कोठे कोठे राहण्यास होते व त्या कालावधीत त्यांनी आणखी कोणता गुन्हा केला आहे काय याबाबत तपास करणे कामी.
१२. दाखल गुन्ह्याचे ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या मुददयांवर सखोल तपास करणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.