Vaishnavi Hagawane Death Case: राजेंद्र हगवणे 8 दिवस कुठे होता? पहिल्या ते आठव्या दिवसाची सर्व डिटेल्स आली बाहेर

Rajendra Hagawane : हुंडाबळी आणि छळ प्रकरणावरुन राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. आज फरार राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आलीय.
Vaishnavi Hagawane Death Case
Rajendra Hagawane Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे शहरातील स्वारगेट परिसरातून अटक केली. घटना घडून आज ८ दिवसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना राजेंद्र हगवणे आणि सुशील हाती लागला. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आठ दिवस कुठे होता याची संपूर्ण माहिती समोर आलीय.

आत्महत्येची घटना घडल्यापासून "आम्ही तपास करतोय, शोध घेतोय, आरोपीपर्यंत लवकर पोहचू" हे पोलिसांची ठरलेली वाक्य होती. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे हा पुणे शहरात असताना सुद्धा पिंपरी चिंचवड पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Vaishnavi Hagawane Death Case
Vaishnavi Hagawane Son: वैष्णवीच्या मृत्यूनंतर तान्ह्या बाळावरही अत्याचार? झोपेचं इंजेक्शन अन्..; कस्पटे कुटुंबाचा गंभीर आरोप

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक पोलस आयुक्त, एक सह पोलीस आयुक्त, एक अपर पोलिस आयुक्त आणि ६ पोलीस उपायुक्त आहेत आणि त्याबरोबरच शेकडो पोलिस कर्मचारी आहेत. असं असताना राजेंद्र हगवणे हा इतका चपळ आणि हुशार होता की, तो पोलिसांना गुंगारा देत होता का? पिंपरी चिंचवड पोलीस कमी पडले? दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत ते नेमके कुठले? पाहूया..

Vaishnavi Hagawane Death Case
Mayuri Jagtap Hagawane : सासरच्यांकडून मारहाण, कपडे फाडले, सासऱ्याने छातीला हात लावला; वैष्णवीची जाऊ मयुरीच्या आईचा खळबळजनक आरोप

१. पहिल्या २ दिवस पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल का नाही घेतली?

२. बावधन पोलिस ठाण्याने कस्पटे कुटुंबीयांची तक्रार घेतली नाही? का घ्यायला वेळ लावला?

३. राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात होता पण हे पोलिसांना कळले नाही का?

४. हगवणे पिता पुत्र अनेकांना भेटल्याचे सी सी टिव्ही जर माध्यमांना मिळत असतील तर ते पोलिसांना आधी मिळाले नाहीत का?

५. ३ दिवस वैष्णवी हगवणे यांचे बाळ कुठे गेले याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास केला का?

आज सुद्धा "तपासाच्या नावाखाली" आणि "गुन्ह्याच्या अनुषंगाने" पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी अवघ्या २ मिन १५ सेकंद मध्ये पत्रकार परिषद उरकली. यावरून हे स्पष्ट होतं की "आम्ही हगवणे याला अटक केली" हे सांगायचं तर होतं पण माध्यमांचे प्रश्नांची उत्तरं द्यायला मात्र पोलिस तयार नव्हते.

आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांचा घटनेनंतर प्रवास

१६ मे: वैष्णवी ची आत्महत्या

17 मे: इंडेवेअर या आलिशान गाडी ने औंध रुग्णालयात मृतदेह पाहण्यासाठी दाखल

अटक होण्याची शक्यता लक्षात येताच गाडी बदलत धार गाडीने मुहूर्त लॉन्स त्यानंतर पवना डॅम येथील पावना धरण परिसरात बंडू फाटक यांच्या फार्म हाऊस वर मुक्कामी

18 मे: थार गाडीने आळंदी आणि वडगाव मावळ येथे परिसरात मुक्काम

19 मे: गाडी परत बदलली आणि बोलेरो गाडीने पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पलायन आणि सातारा जिल्ह्यातील पुसेगाव मध्ये मुक्काम

20 मे: पुसे गावातून पसरणी मार्गे कोगनळी येतील हॉटेल हेरिटेज मध्ये मुक्काम

21 मे: प्रीतम पाटील यांच्या शेतावर दोघांचा मुक्काम

22 मे: दोघे ही पुण्यामध्ये दाखल

23 मे: पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातून अटक

ज्यावेळी या घटनेला माध्यमांनी वाचा फोडली त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस, राजकीय नेते यांनी यात उडी मारली. पिंपरी चिंचवड हे शहर गेल्या काही वर्षांपासून वाढत चाललं आहे. व्हाईट कॉलर गुन्हेगारी ते अगदी किरकोळ वाद किंवा कोयत्याने हल्ला आणि अपघात, या शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे याला वेळीच जर आळा घातला नाही तर या शहरातील गुंडगिरी फोफावत जाईल हे मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com