Heavy Silk Saree Tips: महागड्या साड्यांना ड्राय क्लीनिंग कशाला? घरीच वापरा या सोप्या ट्रिक्स

Sakshi Sunil Jadhav

जड साड्या

लग्नसमारंभ किंवा खास कार्यक्रमांमध्ये घालण्यात येणाऱ्या बनारसी, सिल्क किंवा कांजीवरमसारख्या महागड्या आणि जड साड्या धुताना खूप काळजी घ्यावी लागते.

how to wash saree at home

साडीवरील केअर लेबल वाचा

साडीवर दिलेले केअर इंस्ट्रक्शन टॅग नीट वाचणे खूप महत्त्वाचे आहे. त्यावर “ड्रायक्लिन ओन्ली” असे लिहिले असल्यास घरच्या घरी धुणे टाळा.

banarasi saree care guide

हलक्या डिटर्जेंटचा वापर करा

जड साड्या धुण्यासाठी साधा डिटर्जेंट पावडर वापरू नका. त्याऐवजी बेबी शॅम्पू किंवा सिल्कसाठी खास लिक्विड क्लीनर वापरणे योग्य ठरते.

banarasi saree care guide

थंड पाण्यात साडी भिजवा

एका टबमध्ये थंड पाणी घ्या आणि त्यात डिटर्जेंट नीट मिसळा. त्यानंतर साडी 5 ते 7 मिनिटेच त्या पाण्यात भिजवून ठेवा.

saree storage and care

साडी चोळू नका

जरी, कढाई किंवा सिक्विन असलेल्या साड्या कधीही जोरात चोळू नयेत. पाण्यात हलक्या हाताने वर-खाली करून स्वच्छ करा.

bridal saree care tips

डाग काढण्यासाठी घरगुती उपाय

हलका डाग असल्यास त्यावर लिंबाच्या रसाचे काही थेंब लावा. 2 ते 3 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. आधी साडीच्या कोपऱ्यावर टेस्ट करणे विसरू नका.

bridal saree care tips

वॉशिंग मशीन वापरताना काळजी घ्या

मशीनमध्ये धुताना साडी उलटी करून वॉशिंग बॅगमध्ये ठेवा. त्यानंतर डेलिकेट किंवा सिल्क मोड निवडा आणि स्पिन ऑप्शन कमी ठेवा.

saree cleaning without dry clean

साडी पिळू नका

धुतल्यानंतर साडी कधीही पिळू नका. टॉवेलवर पसरवून अतिरिक्त पाणी शोषून घ्या.

saree cleaning without dry clean

सावलीत सुकवा

साडी नेहमी सावलीत सुकवा. थेट उन्हात ठेवल्यास रंग फिका पडू शकतो.

saree cleaning without dry clean

प्रेस आणि स्टोरेज करताना काळजी

सिल्क किंवा जड साड्यांवर थेट इस्त्री करू नका. मध्ये कापड ठेवून प्रेस करा आणि साडी नेहमी कॉटन कव्हरमध्ये ठेवून साठवा.

saree cleaning without dry clean

NEXT: Sangamner Tourism: वीकेंड ट्रिप प्लॅन करताय? 1-2 दिवसांत संगमनेरजवळची ही सुंदर ठिकाणं नक्की पाहा

Sangamner tourism
येथे क्लिक करा