
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने आयपीएल २०२५ ची ट्रॉफी जिंकली. बुधवारी ही टीम बंगळुरूमध्ये दाखल झाली. या टीमचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विजयाचा जल्लोष म्हणून बंगळुरूमध्ये विजय रॅली काढण्यात आली होती. या टीमला पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडिअमबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
आरसीबीच्या विजयी रॅलीला गालबोट लागले. चॅम्पियन टीमला पाहण्यासाठी बंगळुरूमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. याचदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत अनेक जण बेशुद्ध पडले तर कुणी जखमी झाले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण गर्दीला आवरणं त्यांनाही मुश्किल झालं. या चेंगराचेंगरीमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि पुरूषांचा समावेश आहे. तर २० पेक्षा अधिक जण जखमी जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आरसबीचे चाहते झाडं आणि बसेसवर चढून खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी प्रयत्न करत होते. गर्दी इतकी होती की अनेकांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला त्यामुळे अनेक जण बेशुद्ध पडले. एएनआयने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 'काही चाहते चिन्नास्वामी स्टेडियमच्या भिंतीवर आणि कुंपणावर चढले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियम आणि विधानसौधाच्या बाहेर चॅम्पियन टीमची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.