The Hindu
देश विदेश

Bengal Bandh: आज १२ तासांसाठी बंगाल बंद; भाजपच्या आवाहनाला मुख्यमंत्री बॅनर्जींचं उत्तर

BJP Called Bengal Bandh: रॅली काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पश्चिम बंगाल पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या घटनेचा भाजपने निषेध केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती.

Bharat Jadhav

कोलकाता बलात्कार आणि हत्येप्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज (बुधवार) 12 तासांसाठी पश्चिम बंगाल बंदची घोषणा केली आहे. राज्याचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारला नबन्ना अब्बियान रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार धरले आहे. राज्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि रॅलीवर केलेल्या लाठीचार्जवरून भाजप नेत्याने ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

भाजपने आज 12 तासांचा बंद पुकारला आहे हा बंद सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यत असणार आहे. मात्र ममता बॅनर्जी सरकारने या बंदला परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्वसामान्य जनतेला भाजप बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केलंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मुख्य सल्लागार अलपन बंदोपाध्याय यांनी मंगळवारी सांगितले की, सरकार बुधवारी कोणत्याही बंदला परवानगी देणार नाहीये. आम्ही लोकांना यात सहभागी न होण्याचे आवाहन करत आहोत. सामान्य जनजीवन प्रभावित होऊ नये यासाठी सरकार सर्व पावले उचलेल,असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रपती राजवटीची मागणी सुवेंदू अधिकारी यांनी केली. विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. कोलकाता येथील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येमध्ये गुंतलेल्यांना संरक्षण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देत असल्याचा आरोप अधिकारी यांनी केलाय. ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करतांना भाजपने त्यांना “हुकूमशहा” म्हटलंय. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुवेंद्र अधिकारी यांनी केलीय.

भाजपने सीबीआयने बॅनर्जी आणि पोलीस आयुक्त विनीत गोयल यांची पॉलीग्राफ चाचणी घ्यावी अशी मागणी भाजपने केलीय. पीडितेचा मृत्यू हा आत्महत्येने झाल्याची माहिती पोलिसांनी सुरुवातीला दिली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजमीनामा द्यावा. आरजी कार हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार-हत्येला जबाबदार असलेल्यांना अटक करावी, या मागणीसाठी शेकडो आंदोलककर्त्यांनी प्रामुख्याने तरुणांनी मंगळवारी दुपारी शहरभरात दोन ठिकाणी 'नबान्ना अभिजन' आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT