Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र लग्नाचा सीझन सुरू आहे. सर्वसामान्यांपासून ते अनेक कलाकार, नेते मंडळी देखील लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
लग्नात नववधू आणि वराला उखाणे घेण्याची जुनी परंपरा आजही जपली जाते. यासाठी लग्नात नववधुसाठी भन्नाटे उखाणे या वेबस्टोरीतून पाहूया.
तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी, .....रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात, ... रावांचं नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात
आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून, .... रावांचं नाव घेते, तुमचा मान राखून.
गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून, .... रावांचे नाव घेते .... ची सून.
आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे, ..... रावांसाठी, सोडून आले मी सारे.
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, .....रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.
आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा, ......च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी, ....रावांचे नाव घेते साथ जन्मासाठी.