Mamata Banerjee: निती आयोगाच्या बैठकीत नाराजीनाट्य! माईक बंद केल्याने ममता बॅनर्जी संतापल्या, तडकाफडकी बाहेर पडल्या; नेमकं काय घडलं?

Niti Aayog Meeting Delhi: विरोधकांनी बहिष्कार घातला असतानाही ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित होत्या. मात्र बैठक मध्येच सोडून त्या तडकाफडकी बाहेर पडल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
Niti Aayog Meeting: निती आयोगाच्या बैठकीत नाराजीनाट्य! ममता बॅनर्जी संतापल्या, तडकाफडकी बाहेर पडल्या; नेमकं काय घडलं?
Niti Aayog Meeting: Saamtv
Published On

दिल्ली, ता. २७ जुलै २०२४

दिल्लीमध्ये आज निती आयोगाची बैठक पार पडत आहे. देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. विरोधकांनी बहिष्कार घातला असतानाही ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित होत्या. मात्र बैठक मध्येच सोडून त्या तडकाफडकी बाहेर पडल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

Niti Aayog Meeting: निती आयोगाच्या बैठकीत नाराजीनाट्य! ममता बॅनर्जी संतापल्या, तडकाफडकी बाहेर पडल्या; नेमकं काय घडलं?
Pune Crime News: 'मी IAS अधिकारी, नादाला लागू नको', धमकी देत पैसे उकळले, पुण्यातील तरुणीचा प्रताप, अवैध सावकारीचा गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज निती आयोगाची बैठक दिल्लीमध्ये पार पडत आहे. या बैठकीकडे विरोधी पक्षांची राज्य असलेल्या 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली आहे मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित होत्या. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर बोलू न दिल्याने संताप व्यक्त करत ममता बॅनर्जी यांनी बैठक अध्यातच सोडून त्या बाहेर पडल्या.

बैठकीमध्ये बाकी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटे बोलू दिले. मात्र माझा माईक ५ मिनिटांनी बंद केला. हा माझा अपमान आहे, असा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला. तसेच बैठक अर्ध्यात सोडून त्या सभागृहातून बाहेर पडल्या.

Niti Aayog Meeting: निती आयोगाच्या बैठकीत नाराजीनाट्य! ममता बॅनर्जी संतापल्या, तडकाफडकी बाहेर पडल्या; नेमकं काय घडलं?
Maharashtra Politics : मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः तडीपार; शरद पवारांचा अमित शहांना टोला, पाहा VIDEO

दरम्यान, या बैठकीत देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच प्रत्येक राज्यांचे मुख्यमंत्री आपापल्या राज्यातील मुद्याबद्दल बैठकीत मत मांडणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला गेलेत. तर भाजपची सत्ता नसलेल्या तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब, केरळ आणि झारखंड या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.

Niti Aayog Meeting: निती आयोगाच्या बैठकीत नाराजीनाट्य! ममता बॅनर्जी संतापल्या, तडकाफडकी बाहेर पडल्या; नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: 'आरक्षण नाही तर सत्ता येऊ देणार नाही', मनोज जरांगे कडाडले; सत्ताधारी- विरोधकांवर गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com