West bengal Politics : लोकसभेत भाजपचा आकडा होणार कमी, दोन खासदार TMC मध्ये करणार प्रवेश?

West bengal Political News : लोकसभेत भाजपचा आकडा कमी होऊ शकतो. कारण दोन खासदार TMC मध्ये प्रवेश करण्याच्या प्रतिक्षेत आहे, असा दावा वरिष्ठ नेत्याने केला आहे. या नेत्याच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
लोकसभेत भाजपचा आकडा होणार कमी, दोन खासदार TMC मध्ये करणार प्रवेश?
West bengal Politics Saam tv
Published On

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. टीएमसीचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांच्या दाव्याने बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे दोन खासदार २१ जुलै रोजी टीएमसीमध्ये सामील होणार असल्याचा दावा कुणाल घोष यांनी केला आहे. दोन खासदारांनी टीएमसीत प्रवेश केल्यास भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

टीएमसीचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांनी २१ जुलै रोजी भाजपच्या दोन खासदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या दोन्ही खासदारांच्या प्रवेशाविषयी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेत भाजपचा आकडा होणार कमी, दोन खासदार TMC मध्ये करणार प्रवेश?
BJP Politics: भाजपकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू; रात्री उशिरापर्यंत खलबतं, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

घोष यांनी दावा केला आहे की, 'पश्चिम बंगालमध्ये भाजपचे १२ खासदार आहेत. त्यातील दोन आमच्या संपर्कात आहेत. त्यांनी संपर्क करून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते ममता बॅनर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जुलै रोजी प्रवेश करण्याची शक्यता आहे'. दरम्यान, पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे काही काळ थांबण्याचा सल्ला तृणमूल काँग्रेसने दिला आहे, असं सांगण्यात येत आहे.

लोकसभेत भाजपचा आकडा होणार कमी, दोन खासदार TMC मध्ये करणार प्रवेश?
BJP On Vidhansabha: विधानसभेत भाजप 150 जागा लढवणार? नेमकी रणनिती काय?

'ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. भाजपचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार यांनी घोष यांचा दावा फेटाळत म्हटलं की, 'कुणाल घोष नेहमीच असं विधान करत असतात. त्यांच्या दाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही'. आता २१ जुलैपर्यंत थांबलं पाहिजे. आम्ही याआधी देखील घोष यांच्या सारखे दावे ऐकले आहेत. ते प्रसिद्धीसाठी असे विधान करत असतात'. 'टीएमसीकडून अशा प्रकारचे दावे होत असतात. त्यामुळे त्यांच्या दाव्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असेही भाजपने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com