Pan Masala: पान मसाल्याच्या पॅकेटवर होणार मोठा बदल, कंपन्यांना पॅकेजिंगबाबत सरकारचे निर्देश

Pan Masala Packaging Rule: सरकारने पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत एक नवीन निर्देश जारी केलाय. यात कंपन्यांना या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
Pan Masala Packaging Rule:
Government announces new packaging guidelines mandating clear MRP and details on all pan masala packets from February 2026.saam tv
Published On
Summary
  • सरकारने पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत मोठा बदल

  • २०२६ पासून सर्व पॅकेटवर एमआरपी आणि अनिवार्य माहिती द्यावी लागेल.

  • हा बदल कायदेशीर मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम २०११ अंतर्गत करण्यात आलाय.

ग्राहक व्यवहार विभागाने पान मसाला कंपन्यांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा बदल लागू केलाय. आता कोणत्याही आकाराच्या किंवा वजनाच्या पान मसाल्याच्या पॅकेटवर किरकोळ विक्री किंमत आणि इतर सर्व अनिवार्य तपशील स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक असणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, हा नियम कायदेशीर मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम २०११ अंतर्गत सुधारित करण्यात आला आहे. हा नियम १ फेब्रुवारी २०२६ पासून देशभरात लागू होईल. या तारखेपासून सर्व उत्पादक, पॅकर्स आणि आयातदार नियमांचे पालन करावे लागले. जर तुम्ही पान मसाल्याचे सेवन करत असाल तर तुम्हाला किंमतींकडे लक्ष द्यावे लागेल.

१० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या पॅकेटची सूट हटवली

या दुरुस्तीचा सर्वात जास्त परिणाम लहान पॅकेटवर होणार आहे. जुन्या प्रणालीनुसार १० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाच्या लहान पॅकेट्ससाठी काही घोषणांमधून सूट देण्यात आली होती. नवीन प्रणाली अंतर्गत ही सूट पूर्णपणे काढून टाकण्यात आलीय. आता १० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाच्या पॅकवर देखील किरकोळ विक्री किंमत आणि सर्व अनिवार्य घोषणा स्पष्टपणे छापाव्या लागणार आहेत. सरकारने नियम २६(अ) अंतर्गत जुनी तरतूद हटवून पान मसाल्यासाठी हा नवीन नियम जोडणारी अधिसूचना (GSR 881(E)) जारी करण्यात आलीय.

Pan Masala Packaging Rule:
Bharat Taxi App : स्वस्तात मस्त प्रवास! भारत सरकारची पहिली टॅक्सी सेवा सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती

हा निर्णय घेण्यामागे दोन मुख्य उद्दिष्टे आहेत:

ग्राहक संरक्षण आणि फसव्या किंमतींवर प्रतिबंध

ग्राहकांना पारदर्शक किंमतीची माहिती देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. लहान पॅकेटवरून दिशाभूल करणाऱ्या किंमती रोखणे, ग्राहकांना अधिक माहितीपूर्ण आणि योग्य निर्णय घेण्यास अनुमती देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

Pan Masala Packaging Rule:
Sanchar Saathi App: एका दिवसात ६ लाख लोकांनी डाउनलोड केला 'संचार सारथी'; अ‍ॅपची खासियत आहे तरी काय?

जीएसटी आणि महसूल संकलन सोपं होईल

सर्व पॅकेजेसवर अनिवार्य आरएसपीमुळे पान मसाल्यावर आरएसपी-आधारित जीएसटी रचना लागू करणे सोपे होईल. यामुळे जीएसटी कौन्सिलच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी, कर मूल्यांकनात पारदर्शकता आणि महसूल संकलनात वाढ सुनिश्चित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com