भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामना सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूनं अचानक घेतला संन्यास, भावुक पोस्ट

mohit sharma announces retirement from all formats : भारतीय क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मानं अचानक निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे, असं त्यानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Mohit Sharma Retirement
Mohit Sharma Retirementsaam tv
Published On

भारताचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मोहित २०१५ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तब्बल दहा वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या मोहितनं आज, ३ डिसेंबरला निवृत्ती जाहीर केली.

Mohit Sharma Retirement
Virat Kohli Video : अर्रर्रर्र श्यॅsss, थेट इग्नोरच केलं; विराट कोहलीनं गौतम गंभीरकडं बघितलंच नाही, व्हिडिओ व्हायरल

मोहित शर्मा गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत होता. आयपीएलच्या मागील पर्वात तो दिल्ली कॅपिटल्समध्ये होता. पण त्यापुढच्या पर्वासाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावाच्या काही दिवस आधीच संघानं त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. याच मोहित शर्माने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले. याबाबतची माहिती त्यानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टद्वारे दिली आहे.

Mohit Sharma Retirement
टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; धाकड ऑलराउंडरचं कमबॅक, शुभमन गिलबाबत घेतला मोठा निर्णय

सर्वांना धन्यवाद!

मोहित शर्मा २०१४ च्या टी २० वर्ल्डकप आणि २०१५ मधील वनडे वर्ल्डकप संघात होता. २०१५ मध्येच तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानं निवृत्तीसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आज मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घोषित करत आहे. हरयाणाकडून माझ्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर मला टीम इंडियाची जर्सी घालण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी आयपीएलमध्येही खेळलो. माझ्यासाठी हा प्रवास खऱ्या ठरलेल्या एखाद्या स्वप्नासारखं होतं. या प्रवासात हरयाणा क्रिकेट असोसिएशननं मला खूप साथ दिली. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. अनिरुद्ध सरांचे खूप खूप आभार. त्यांनी कायम मला मार्गदर्शन केलं. माझ्यावर विश्वास ठेवला. माझा पुढचा प्रवास सोपा केला. हे सर्व मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असं तो म्हणाला.

बीसीसीआय, माझे प्रशिक्षक, माझे सहकारी खेळाडू, आयपीएल संघ, सपोर्ट स्टाफ आणि माझ्या सर्व मित्रांना त्यांनी दिलेले प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो. या क्षणाला मी माझ्या पत्नीचे आभार मानतो. तिने नेहमीच माझे मूड स्विंग्ज आणि राग सांभाळून घेतला. प्रत्येक वेळी माझी साथ दिली, असेही मोहितने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मोहित शर्माची कारकीर्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत मोहित शर्मा टीम इंडियाकडून वनडे आणि टी २० सामने खेळला आहे. २६ वनडे सामन्यांत त्यानं एकूण ३१ विकेट्स घेतल्या. त्यात २२ धावांच्या बदल्यात त्याने चार विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. टी २० आंतरराष्ट्रीयमध्ये मोहित एकूण ८ सामने खेळला. त्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये मोहित शर्मा हा चार संघांसाठी खेळला. त्यात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज या संघांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये तो एकूण १२० सामने खेळला. त्यात २६.२२ च्या सरासरीने १३४ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com