Bangladesh Padma River Bus Accident Google
देश विदेश

Bus Accident : पद्मा नदीवर भीषण अपघात, ४० जणांना घेऊन जाणारी बस कोसळली

Padma River bus accident : बांगलादेशमधील पद्मा नदीवर ४० प्रवाशांनी भरलेली बस कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. दौलतदिया फेरी टर्मिनलजवळ झालेल्या या अपघातानंतर बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

Bangladesh Padma River Bus Accident : ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयंकर अपघात झाला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली प्रवासी बस पद्मा नदीत कोसळली. बांगलादेशमधील ढाकाजवळ असलेल्या दौलतदिया येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. सायकांळी पाच वाचण्याच्या सुमारास फेरी टर्मिनल क्रमांक ३ समोर हा अपघात झाला. आतापर्यंत २ जणांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत मोठी जिवीतहानी होऊ शकते, असा अंदाज स्थानिक मीडियाकडून झाल्याच अंदाज वर्तवला जात आहे.

४० प्रवाशांना घेऊन बस राजबारीहून ढाकाकडे निघाली होती. त्यावेळी पद्मा नदीवर आल्यानंतर दौलतदिया येथील फेरी टर्मिनल क्रमांक ३ वर दुर्घटना झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचावपथकांनी तात्काळ धाव घेतली. सध्या या ठिकाणी बचावकार्य वेगात सुरू आहे. अग्निशमन दलाची बचाव पथके, गोताखोर यांच्याकडून बचावकार्य वेगात सुरू आहे. धो धो कोसळणारा पाऊस आणि अंधार यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. पाणबुडे बचावकार्य करत आहेत. अधिक तपशील अपेक्षित आहे.

दौलतदिया घाटावर झालेल्या या दुर्दैवी अपघातात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. त्याच्यावर गोलंदा उपझिला आरोग्य संकुलात उपचार सुरू आहेत. ६० वर्षांच्या रेहेना बेगम आणि ५५ वर्षीय मर्झिना बेगम असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. २९ वर्षीय नुसरत यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांघण्यात येत आहे.

पद्मा नदीत बस बुडाल्यानंतर 'हमजा' या बचाव जहाजाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ढाक्याकडे जाणारी प्रवासी बस अनियंत्रित झाली आणि दौलतदिया घाटावरील तरंगत्या फलाटावरून पद्मा नदीत कोसळली. पातुरियासाठी एक फेरी नुकतीच निघाली होती आणि दुर्घटनाग्रस्त बस पुढच्या फेरीची वाट पाहत होती. त्याचवेळी अचानक हसना हेना नावाच्या एका युटिलिटी फेरीने जोरदार धडक दिली. त्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे स्थानिक मीडियाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT