Pakistan’s  Saam Tv (AI)
देश विदेश

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Balochistan latest attack news : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बंडखोरांनी १४ शहरांमध्ये भीषण हल्ले केले. आतापर्यंत १२० जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बीएलएने हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून पाकिस्तानी लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Namdeo Kumbhar

बलूचमधील बंडखोरांनी पाकिस्तानच्या १४ शहरात हल्ले केले आहेत, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त जण जखमी आहेत. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सशस्त्र बलुच बंडखोरांनी १४ वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये सुरक्षा दल, पोलिस प्रतिष्ठाने आणि नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्याला पाकिस्तानी लष्कराकडून जरदार प्रत्युत्तर देण्यात आले. बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या चकमकीत ९२ बंडखोर ठार झाले, तर इतरांमध्ये पोलिस आणि नागरिकांचा समावेश आहे. क्वेटा, ग्वादर, मास्टुंग, नुश्की, दलबंदिन, पंजगुर, तुम्प आणि पासनी यासह अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार पसरला.

भारतावर आरोप -

पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी हल्ले उधळून लावल्याबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक केले आणि पाकिस्तान दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच ठेवेल असे सांगितले. लष्कराने दहशतवाद्यांना देशाबाहेरून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप केला. पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे.

पोलिस अधिकाऱ्यासह १८ जणांचे अपहरण; कैद्यांची सुटका

बंडखोरांनी बलुचिस्तानच्या ९ जिल्ह्यांमध्ये गोळीबार आणि आत्मघातकी बॉम्बस्फोटांद्वारे हल्ला चढवला. लष्करी प्रतिष्ठाने, पोलिस आणि नागरी प्रशासन अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. बंडखोरांनी बलुचिस्थानमधील एका उपजिल्हा आयुक्तासह १८ पोलिसांचे अपहरण केले. त्याशिवाय तुरुंगातून ३० कैद्यांनाही मुक्त केले अन् तेथील शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.

बलुचिस्तान सरकारने एक निवेदन दिले

बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद म्हणाले की, बंडखोरांनी क्वेटा, ग्वादर, मकरन, हब, चमन, नसीराबाद आणि नुश्कीसह अनेक भागात हल्ला केला आहे. नागरिकांच्या जीवितहानीबद्दलची माहिती अस्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री अत्ताउल्लाह तरार म्हणाले की, दहशतवाद्यांनी पोलिस चौक्या आणि फ्रंटियर कॉर्प्सच्या तळांना लक्ष्य केले. पण सुरक्षा दल सतर्क असल्याने हल्ले उधळून लावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT