Ayodhya Ram Mandir Security ANI
देश विदेश

Ayodhya Ram Mandir Security: सशस्त्र वाहने, १०००० हून अधिक सीसीटीव्ही, ब्लॅककॅट कमांडो; अयोध्येत नेमकी कशी आहे सुरक्षाव्यवस्था?

Ayodhya Ram Mandir Security Update: राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी अयोध्येतील कानाकोपऱ्यात पोलिसांची सुरक्षाव्यवस्था पाहायला मिळणार आहे. लोकार्पण सोहळ्यामुळे अयोध्येला छावणीचं स्वरुप आलं आहे..

Vishal Gangurde

Ayodhya Ram Mandir Inauguration:

राम मंदिराचा लोकार्पण सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरु झाली आहे. या दिवशी अयोध्येतील कानाकोपऱ्यात पोलिसांची सुरक्षाव्यवस्था पाहायला मिळणार आहे. लोकार्पण सोहळ्यामुळे अयोध्येला छावणीचं स्वरुप आलं आहे. उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाने अयोध्या परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. (Latest Marathi News)

अयोध्येत २१-२२ जानेवारीला सर्वसामान्यांना प्रवेश नाही. त्यामुळे २२ जानेवारीला अयोध्येत विना पास येणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो. या सोहळ्यासाठी सीआरपीएफ ते यूपी पोलिसांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं आहे. तर राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी अयोध्येत जड वाहनांना बंदी असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संपूर्ण अयोध्या शहरावर १०००० सीसीटीव्हींची नजर असणार आहे. तसेच पहिल्यांदा चेहरा ओळखणारे एआय कॅमेरा लावण्यात आले आहेत. या सोहळ्याला देशातील अनेक बडे नेते मंडळी, सेलिब्रिटी, परदेशी पाहुणे हजेरी लावणार आहेत.

अयोध्येत एकूण १३ हजारांहून अधिक सुरक्षाकर्मचारी तैनात असणार आहेत. यूपी एटीएसचे कंमोडो, जवानांसोबत आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि अँटी ड्रोन सिस्टिम असणार आहे. एटीएसची एक मोठी तुकडी अयोध्येत पोहोचली आहे. आयबी आणि रॉच्या अधिकारीही अयोध्येत पोहोचले आहेत.

पंतप्रधान मोदींची सुरक्षा कशी असेल?

२२ जानेवारीला राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी १ हजार जवान तैनात असणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी DIG, 17 SP, 40 ASP, 82 DSP, 90 निरीक्षक सहित १००० हून कॉन्स्टेबल असणार आहेत. तसेच ४ कंपन्यांचे पीएसी देखील असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT