Ayodhya Ram Mandir Inauguration: PM मोदी 22 जानेवारीला अयोध्येत, कसा असेल पूजेचा कार्यक्रम? आधी कोणती पूजा? जाणून घ्या

Ayodhya Ram Mandir Inauguration News: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 22 जानेवारीला हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार असून संपूर्ण जगाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. या सोहळ्याचे प्रमुख यजमान पंतप्रधान मोदी असणार असून अयोध्येतील सरकारी कार्यक्रमाचा तपशील समोर आला आहे.
Ayodhya Ram Mandir Inauguration
Ayodhya Ram Mandir InaugurationSaam Digital
Published On

Ayodhya Ram Mandir Inauguration

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 22 जानेवारीला हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार असून संपूर्ण जगाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. या सोहळ्याचे प्रमुख यजमान पंतप्रधान मोदी असणार असून अयोध्येतील सरकारी कार्यक्रमाचा तपशील समोर आला आहे. नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी 12:05 वाजता श्री रामजन्मभूमी मंदिरात अभिषेक आणि पूजा करतील आणि दुपारी एक वाजता जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी 2:15 वाजता कुबेर टिळा येथील शिवमंदिरात पूजा करणार आहेत. दरम्यान राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी सुमारे 8 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

दरम्यान राम मंदिराच्या आतील एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मंदिरातील सौंदर्य, भव्यता आणि सजावट स्पष्टपणे दिसत आहे. संगमरवरी पासून बनवलेलं भव्य मंदिर प्रकाशात न्हाऊन निघालं आहे. खांब फुलांनी सजवण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रभावी समन्वय, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि वैद्यकीय सेवांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यात आलं आहे. त्यामुळे हजारो भाविक आणि सुमारे 8,000 आमंत्रित पाहुणे अयोध्येला पोहोचू शकतील. हा ऐतिहासिक कार्यक्रम कोट्यवधी भाविकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे मजबूत आरोग्य सेवा आणि उपाय आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं होतं. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व वैद्यकीय तयारी आणि प्रतिसाद योजना तयार करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारसोबत काम करत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

Ayodhya Ram Mandir Inauguration
Mumbai Police Recruitment: मुंबई पोलिसांची 12899 पदे रिक्त, कोणत्या पदासाठी किती जागा मंजूर? जाणून घ्या

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू असून सात दिवस चाललेल्या रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा आज पाचवा दिवस आहे. हा कार्यक्रम 16 जानेवारीला सुरू झाला आणि 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकाने सांगता होणार आहे. पीएम मोदींनी 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले होते.

Ayodhya Ram Mandir Inauguration
Goa Crime: आईस्क्रीम आणण्यासाठी जाताना पत्नी बुडाली समुद्रात, तपासात उघड झाली भलतीच माहिती, अलिशान हॉटेलच्या मॅनेजरचा प्रताप ऐकून व्हाल थक्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com