Ram Mandir Inauguration: खबरदार! राममंदिर सोहळ्याबाबत खोट्या बातम्या पसरवाल तर... केंद्र सरकारच्या माध्यमांना सूचना

Ayodhya Ram Mandir Inauguration: सोशल मीडियावर या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात असंख्य बातम्या, फोटो अन् व्हिडिओ प्रसारित होत आहेत. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या सोहळ्यासंदर्भात चुकीच्या बातम्याही पसरत असल्याचे समोर आले आहे.
Ram Mandir
Ram MandirSaam TV
Published On

Ram Mandir Inauguration:

२२ जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशभरात राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात असंख्य बातम्या, फोटो अन् व्हिडिओ प्रसारित होत आहेत. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या सोहळ्यासंदर्भात चुकीच्या बातम्याही पसरत असल्याचे समोर आले आहे. याविरोधात आता केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत.

राम मंदिर उद्घाटन (Ram Mandi Ceremony) सोहळ्यासंदर्भात अनेक प्रकारच्या चुकीच्या बातम्या विविध साइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरत आहेत. यावर केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने मीडिया आऊटलेट्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला राम मंदिर उद्घाटन सोहळ्या संदर्भात खोट्या, दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित आणि प्रकाशित न करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Information And Broadcasting Ministry) यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये अलीकडेच असे दिसून आले आहे की सोशल मीडियावर काही असत्य, चिथावणीखोर आणि दिशाभूल करणारे संदेश व्हायरल केले जात आहेत. हे संदेश जातीय सलोखा आणि सार्वजनिक कायदा सुव्यवस्था बिघडू शकतात. त्यामुळे अशा खोट्या बातम्या पसरवू नका, असे नमूद करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ram Mandir
AI Jobs: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे २५ कोटी लोकांना मिळणार रोजगार: देवेंद्र फडणवीस

दरम्यान, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक फेक बातम्या पसरत असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी बनावट QR कोड असलेला एक WhatsApp संदेश राममंदिर प्राण-प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी झटपट व्हीआयपी तिकिटे मिळवण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता. मात्र ही बातमी खोटी असल्याचे राममंदिर ट्रस्टने स्पष्ट केले होते. तसेच ऑनलाईन शॉपिंग साईट अमॅझोनवरही राममंदिराचा प्रसाद मिळण्याच्या खोट्या बातम्या समोर आल्या होत्या. (Latest Marathi News)

Ram Mandir
Bacchu Kadu News: मोठी बातमी! बच्चू कडू अंतरवाली सराटीकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com