Narendra Modi And Arvind Kejriwal saam tv
देश विदेश

Delhi Election Results : दुसरा जन्म घ्यावा लागेल...; मोदींना चॅलेंज दिल्याचा केजरीवालांचा 'तो' व्हिडिओ तुफान व्हायरल

Delhi Assembly Election Results Today : दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावल्याचं चित्र सुरुवातीच्या कलांमध्ये स्पष्ट झालं आहे. त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांचा नरेंद्र मोदी यांना आव्हान देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जनतेने त्यांना नाकारल्याचं चित्र सुरुवातीच्या कलांमध्ये स्पष्ट झालं आहे. राजधानी दिल्लीत दोन तपांनंतर भाजपचं कमळ फुललं आहे. देशात भाजपची लाट असताना दिल्लीत मागील दोन विधानसभा निवडणुकीत बहुमतानं सत्तेत येणाऱ्या आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. आमचा दिल्लीत पराभव करू शकत नाही, त्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं होतं. तो जुना व्हिडिओ आता दिल्लीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा पराभव निश्चित झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात ते मोठ्या विजयाचे दावे करताना दिसतात. त्यातील एक व्हिडिओ तर सध्या इंटरनेट विश्वास धुमाकूळ घालत आहे. त्यामध्ये केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत आहेत. नरेंद्र मोदी या जन्मात तरी आम आदमी पक्षाला पराभूत करू शकत नाही, असं केजरीवाल म्हणाले होते.

काय म्हणाले होते केजरीवाल?

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींनाच भरसभेतून आव्हान दिलं होतं. 'मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की ते या जन्मात तरी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला पराभूत करू शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल,' असं ते म्हणाले होते. हा जुना व्हिडिओ आता दिल्लीच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर व्हायरल होत आहे. भाजपचे नेते आणि समर्थक हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. याशिवाय, तुम्ही याच जन्मात पराभूत झाला आहात, अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

कौल कुणाला?

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं असून, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा पराभव निश्चित आहे. निकाल अद्याप अधिकृतपणे जाहीर झाले नाहीत. सुरुवातीचे कल बघता दिल्लीत भाजपची सत्ता येणार आहे. धक्कादायक म्हणजे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. सध्या भाजपचे ४७ हून अधिक उमेदवार आघाडीवर आहेत. तर आम आदमी पक्षाचे २३ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसला आणि इतरांना राज्यात खातंही उघडता आलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coolie Public Review: रजनीकांत यांचा 'कुली' फ्लॉप की हिट? वाचा प्रेक्षकांचा रिव्ह्यूव

War 2 OTT : हृतिक रोशन-कियारा अडवाणीची जोडी सुपरहिट, वाचा 'वॉर 2'चे ओटीटी अपडेट

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधाराच्या आवळल्या मुसक्या|VIDEO

Sangmeshwar Amba Ghat : संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकणात जाणाऱ्यांचे हाल

SCROLL FOR NEXT