Pakistani Spy Saam Tv
देश विदेश

Pakistani Spy: ज्योती, देवेंद्र, अरमान नंतर तारीफ...; हरियाणातून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक

Pakistani Spy Mohammad Tarif Arrested: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणातील आणखी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. भारतामधील संवेदनशिल माहिती हा तरूण पाकिस्तानच्या एजंटला पूरवत होता.

Priya More

हरियाणाची प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणात अटक केली आहे. ज्योती मल्होत्रानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक केली जात आहे. हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील आणखी एका तरुणाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणाचे नाव मोहम्मद तारीफ असे आहे. या तरुणाला तावाडू येथून पोलिसांनी अटक केली. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ज्योती मल्होत्रा, नोमान, देवेंद्र, अरमान यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद तारिफ या तरुणाला स्थानिक हवाई दलाच्या स्टेशनशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी नागरिकांसोबत शेअर केल्याचा गंभीर आरोप आहे . अशी देखील माहिती समोर आली आहे की, ६ महिन्यांपूर्वी तारिफ त्याच्या वडिलांसोबत पाकिस्तानला गेला होता.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मोहम्मद तारिफच्या संपर्कात असलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांचीही नावे आहेत. त्यांना भारतासंदर्भात संवेदनशील माहिती मिळाल्याचा संशय आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहम्मद तारिफची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानमध्ये तारिफ कोणाच्या संपर्कात होता आणि त्याने यापूर्वी काही गुप्त माहिती शेअर केली होती का याचाही तपास पोलिस करत आहेत.

मोहम्मद तारिक बऱ्याच काळापासून भारतीय लष्कर आणि संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होता. तो व्हिसा मिळवून देण्याच्या बहाण्याने लोकांना संपर्क करायचा आणि नंतर त्यांना सापळ्यात अडकवून हेरगिरी नेटवर्कचा भाग बनवायचा अशी देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चौकशीदरम्यान तो दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या आसिफ बलोच आणि जाफर यांना गुप्तचर माहिती पुरवत होता. ज्याच्या बदल्यात त्याला पैसे मिळत होते अशी देखील माहिती उघड झाली आहे. अटकेपूर्वी तारिफने त्याच्या मोबाईलमधून अनेक चॅट्स डिलीट करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला वेळीच अटक केली.

मोहम्मद तारिफच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये पाकिस्तानी व्हॉट्सअप नंतर, फोटो, व्हिडीओ आणि लष्करी कारवायाची माहिती आढळून आली आहे. तो दोन वेगवेगळ्या सिमकार्डद्वारे पाकिस्तानी एजंटच्या संपर्कामध्ये होता असे देखील सांगितले जात आहे. आरोपी मोहम्मद तारिफ, आसिफ बलोच आणि जाफर यांच्याविरुद्ध देशद्रोह कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT