Anand Mahindra Saam Tv
देश विदेश

Anand Mahindra Post: चिमुकल्याला महिंद्राची अलिशान कार हवी ७०० रुपयांना; आनंद महिंद्रांनी VIDEO शेअर करत म्हटलं...

Anand Mahindra: महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडिया सक्रिय असतात. ते रोज काही न काही नवीन पोस्ट शेअर करत असतात. नुकताच आनंद महिंद्रानी एक व्हिडिओ एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. यात एक चिमुकल्याने महिंद्राची SUV फक्त ७०० रुपयांना मिळते , असे म्हटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anand Mahindra Post on Viral Video :

महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडिया सक्रिय असतात. ते रोज काही न काही नवीन पोस्ट शेअर करत असतात. चित्रपटांचे कौतुक, सामाजिक विषय अशा सर्व आशयांच्या पोस्ट शेअर ते करत असतात. नुकताच आनंद महिंद्रानी एक व्हिडिओ एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. यात एक चिमुकल्याने महिंद्राची SUV फक्त ७०० रुपयांना मिळते , असे म्हटले आहे. याच व्हिडिओला शेअर करत आनंद महिंद्राची पोस्ट शेअर केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एका मुलाचा शेअर केला आहे. चिकू यादव असे या मुलाचे नाव आहे. त्याचे महिंद्रा कंपनीच्या कारबाबत गैरसमज झाला आहे. यात हा मुलगा त्याच्या वडिलांशी बोलताना दिसत आहे. तो म्हणतो की, 'थार आणि एसयूव्ही आपण ७०० रुपयांना खरेदी करु शकतो. SUV 700 आपण ७०० रुपयांना खरेदी करु शकतो. यात वडील मुलाला समजावताना दिसत आहे की, हे वाहनाचे नाव आहे किंमत नाही'. या लहान मुलाचा गोड गैरसमज झाल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

चिकूचा हा व्हिडिओ आनंद महिंद्रानी शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलय की,'माझ्या मैत्रिणीने मला हा व्हिडिओ पाठवला आणि म्हणाली, मला चिकू खूप आवडतो. त्यामुळे मी त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट पाहिले, मलाही चिकूचे व्हिडिओ खूप आवडले. परंतु जर आम्ही या मुलाची इच्छा पूर्ण करण्याचा विचार केला आणि थार ७०० रुपयांना विकली तर आम्ही लवकरच दिवळखोर होऊ'.आनंद महिंद्रांच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

SCROLL FOR NEXT