Uttar Pradesh News: धक्कादायक! ५ वीत शिकणारा मुलगा, युट्यूबर व्हिडिओ, रिल्स पाहिले अन् आयुष्य संपवलं

UP News: निखील हा शहरातील एका सार्वजनिक शाळेत पाचवीत शिकत होता. गुरुवारी दुपारी 2 वाजता शाळेतून परतल्यानंतर तो घरात खोलीत सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होता.
Uttar Pradesh News
Uttar Pradesh NewsSaamtv
Published On

Uttar Pradesh News:

हल्ली लहान मुलांना लागलेले मोबाईलचे लागलेले वेड भयंकर आहे. दिवसभरात तासनतास लहान मुले मोबाईलवर टाईमपास करताना दिसतात. अशावेळी पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण मोबाईलच्या अतिवापराने मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम तर होतोच, त्याचबरोबर अनेक दुर्घटनाही घडतात. उत्तर प्रदेशच्या हनिपूर जिल्ह्यातून असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पाचवीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईलवर पाहून आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हमीरपूर जिल्ह्यातील भरुआ सुमेरपूर कोतवाली भागात पाचवीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधून आपले आयुष्य संपवले. निखिल उर्फ ​​रज्जू (वय११) असे या मुलाचे नाव आहे. निखील हा शहरातील एका सार्वजनिक शाळेत पाचवीत शिकत होता. गुरुवारी दुपारी 2 वाजता शाळेतून परतल्यानंतर तो घरात खोलीत सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होता.

यावेळी त्याने युट्यूबवर मिठापासून विष बनवणे, मरण्याची सोप्पी पद्धत अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिले. हे व्हिडिओ पाहून निखीलने घरातील खुंटीला फास लावून तपासण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकार पाहताच निखिलच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uttar Pradesh News
Shanishingnapur: शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा

दरम्यान, निखिल हा शाळेत, अभ्यासात हुशार विद्यार्थी होता. त्याला परिक्षेत चांगले मार्क्स मिळायचे असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चिमुकल्या जिवाने अशा प्रकारचा मार्ग का स्विकारला असावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निखीलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुलांच्या हातात मोबाईल देताना काळजी घ्या..

लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभरातून ठराविक वेळेतच मुलाला मोबाईल हाताळण्याची परवानगी द्यावी. तसेच त्याच्या अभ्यासाच्या, गेम्सच्या व्यक्तिरिक्त तो इतर काही सर्च करत नाही ना? याची काळजी घ्यावी. (Latest Marathi News)

Uttar Pradesh News
India Alliance Protest: 'देशभक्त म्हणवणारे पळून गेले...' संसद घुसखोरीवरुन राहुल गांधींचा भाजपवर निशाणा; जंतरमंतरवर इंडिया आघाडीची निषेध सभा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com