ATM Crime: दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सुरक्षा रक्षकाचा मोबाईल घेऊन चोरटे पसार

Nerul News : विशाल राय याने दोन्ही एटीएम फोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आले नाही. खेचून पाहिलं, ढकलून पाहिलं, जोर लावला. मात्र एटीएम मशीन काही उघडली नाही
ATM Crime
ATM CrimeSaam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे

नेरुळ : नेरुळ सेक्टर २१ मधील एसबीआय आणि डीबीएस या दोन बँकेचे एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एटीएम (ATM Crime) फोडू न शकल्याने सुरक्षा रक्षकाजवळील मोबाईल घेऊनच चोरटे पसार झाल्याची घटना घडली. या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

ATM Crime
Maratha Reservation: मराठा आंदोलक मुंबईत धडकण्याची धास्ती; पोलिसांकडून ट्रॅक्टर चालकांना नोटीसा

नेरुळ सेक्टरमधील दोन वेगवेगळे एटीएम मशीन फोडण्याच्या उद्देशाने चोरटे आले होते. आरोपी विशाल राय याने दोन्ही एटीएम फोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आले नाही. खेचून पाहिलं, ढकलून पाहिलं, जोर लावला. (Crime News) मात्र एटीएम मशीन काही उघडली नाही. अनेक प्रयत्न फसल्याने अखेर चोरट्याने एटीएम बाहेरील सुरक्षा रक्षकाचा मोबाईल फोन घेऊन तेथून पळ काढला. याबाबत सुरक्षा रक्षकाने (Police) पोलिसांना माहिती दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ATM Crime
Nashik Crime : दुचाकी चोरी करणारे दोन संशयित ताब्यात; साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

चोरटे २४ तासात ताब्यात 

एटीएम फोडताना आपला चेहरा दिसू नये; म्हणून चेहरा झाकून सीसीटीव्ही कॅमेरा वळवून त्याने चोरीचे कृत्य केले. मात्र तोपर्यंत त्याचा कारनामा सिसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. नेरुळ पोलीसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या मदतीने २४ तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com