उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.बरेलीमध्ये सासरच्या लोकांनी हुंडा कमी दिल्याने महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या पतीने हुंड्यांची मागणी करत तिच्या नाकाचा चावा घेतला आहे, पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
अजमी असे पीडित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सीबी गंज पोलिस ठाण्यात नवऱ्याच्या कुटुंबातील सहा जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमीने मंगळवारी तिचा पती नाझिम, सासरा साबीर आणि कुटुंबियातील इतर सदस्यांविरोधात तक्रार केली आहे. हुंड्यासाठी छळ आणि मारहाण होत असल्याचे, तिने सांगितले.
अजमीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले होते. आम्हाला पाच वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर लगेचच सासरच्यांनी कमी हुंडा दिल्याने माझा छळ सुरू केला. माझ्या नवऱ्याने मला अनेकदा मारहाण केली. घराबाहेरदेखील काढले होते. भांडण मिटवण्यासाठी त्यांच्या पंचायतीकडून देखील प्रयत्न करण्यात आले होते. त्यांनतर अनेकदा पीडितने तडजोड केली. मात्र, यानंतरही सासरच्यांनी माझा छळ केला, असे आरोप तिने केले.
१५ डिसेंबर रोजी सासरच्यांनी तिला मारहाण केली. नवरा नाझिमने तिचे नाक चावले. यात ती गंभीर जखमी झाली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.