Uttar Pradesh Crime News : एक कप चहावरून टोकाचं भांडण झालं; पतीनं पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य, मुलंही हादरून गेली

Husband Killed wife foe Tea : मुलांनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी धरमवीरने त्यांनाही जखमी केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुलं घाबरुन पुन्हा खोलीत गेले.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsSAAM TV
Published On

Uttar Pradesh Crime News :

चहा बनवण्यास उशीर झाला म्हणून नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चहावरुन पती धरमवीर आणि पत्नी सुंदरी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या रागातून पती धरमवीरने पत्नीवर तलवारीने वार करत तिची हत्या केली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजंदारीवर काम करणारा धरमवीर नेहमीप्रमाणे मंगळवारी सळाळी कामावर निघाला होता. त्यांने पत्नी सुंदरीकडे चहाची मागणी केली. त्यानुसार सुंदरी देखील स्वयंपाकघरात चहा बनवू लागली.

पाच मिनिटांनंतर धरमवीरने पुन्हा सुंदरीकडे चहा मागितला. तेव्हा चहा तयार व्हायला अजून 10 मिनिटे लागतील असं सुंदरीने धरमवीरला सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uttar Pradesh Crime News
Pune Shocking News : पुण्यातील भाजप युवा नेत्याची आत्महत्या, रेल्वेखाली येत संपवलं जीवन

मात्र चहा तयार व्हायला आणखी उशीर होणार हे ऐकून धरमीवर संतापला आणि पत्नीशी वाद घालू लागला. रागात त्याने भांडी देखील फेकून दिली. इथवर न थांबता तो तलवार घेऊन आला आणि पत्नी सुंदरीवर सपासप वार केली. सुंदरीचा ओरडण्याचा आवाज ऐकून दुसऱ्या खोलीत झोपलेली त्यांची मुले बाहेर आली. (Crime News)

मुलांनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी धरमवीरने त्यांनाही जखमी केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुलं घाबरुन पुन्हा खोलीत गेले. त्यानंतर जखमी सुंदरी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली आणि काही वेळातच मृत्यू झाला.

पोलीस येईपर्यंत धरमवीर पत्नीच्या मृतदेहाशेजारी रडत बसला होता, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी आरोपी धरमवीरला अटक केली आहे. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, धरमवीरविरुद्ध आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com