Wildlife Snake smuggling: बिस्किट अन् केकच्या पाकिटातून सापांची तस्करी; मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील खळबळजनक घटना

Bangkok Snake smuggling: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका व्यक्तीला या प्रकरणी अटक केलीये. सदर प्रवाशाच्या चेक-इन सामानाची तपासणी केल्यावर यात परदेशी प्रजातीचे साप आढळून आले.
Wildlife Snake smuggling
Wildlife Snake smugglingSaam TV

सचिन गाड

Snake smuggling:

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता सापांची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून ११ परदेशी प्रजातीचे साप (Snake) जप्त करण्यात आले आहेत. बिस्किट आणि केकच्या पाकिटातून या सापांची तस्करी करण्यात आलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wildlife Snake smuggling
Bihar Crime: शेतात भाजीची पाने तोडताना सापडली, बाप लेकाने केलेल्या मारहाणीत १४ वर्षीय मुलीचा मृत्यू; संतापजनक घटना

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केलीये. यात ९ ball pythons (python regius) प्रजातीचे तर २ corn snakes आणि (pantherophis guttatus) प्रजातीचे हे साप असल्याचं समजलंय. परदेशी जातीचे साप असल्याने त्यांना तात्काळ बँककॉकला परत पाठवले जाणार आहे.

मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी २० डिसेंबर रोजी बँकॉकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आलेल्या एका व्यक्तीला या प्रकरणी अटक केलीये. सदर प्रवाशाच्या चेक-इन सामानाची तपासणी केल्यावर यात परदेशी प्रजातीचे साप आढळून आले.

विमानातून थेट सापांची तस्करी होत असल्याचे समजल्यावर प्रवाशी आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालीये. परदेशातून आणलेल्या या सापांची भारतात मोठी किंमत आहे. परदेशात 40$ ते 50$ मध्ये हे साप विकले जातात.

आजवर तस्करीच्या अनेक घटना घडल्या आहेत. विविध अमली पदार्थ, वस्तू यांसह आता प्राण्यांची तस्कारी केली जाते. मात्र आतापर्यंत सापांची अशा पद्धतीने तस्कीरी होणे ही पहिलिच घटना आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने कारवाई करत याबाबत अधिक तपास करत असल्याचं म्हटलं आहे.

Wildlife Snake smuggling
Bihar Crime: शेतात भाजीची पाने तोडताना सापडली, बाप लेकाने केलेल्या मारहाणीत १४ वर्षीय मुलीचा मृत्यू; संतापजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com