Odisha Crime News : शेतातूत फुलकोबी चोरल्याच्या संशयातून जन्मदात्या आईला खांबाला बांधून मारहाण, काळीज पिळवटून टाकणारी घटना

Crime News: ओडिशातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. एका मुलाने स्वतः च्या वयोवृद्ध आईला वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 Crime News
Crime NewsSaam tv

Odisha Shocking News:

ओडिशातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. एका मुलाने स्वतः च्या वयोवृद्ध आईला वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओडिशाच्या कोओंझार जिल्ह्यातील चंपुआ पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.

शेतातून फुलकोबी चोरल्याच्या संशयावरुन मुलाने हे राक्षसी कृत्य केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करुन त्याला अटक केली आहे. चंपुआमधील सरसापसी गावात ही घटना घडली आहे. पीडित महिलेचे नाव सुभ्रदा मंहतो आहे. महिलेचा धाकटा मुलगा शत्रुघ्नने ही मारहाण केली आहे. मुलाच्या शेतातील फुलकोबीची भाजी तोडल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद खूप टोकाला गेला आणि शत्रुघ्नने आपल्या आईला वीजेच्या खांबाला बांधले आणि बेदम मारहाण केली.

 Crime News
Mumbai Crime: मुंबईतील चुनाभट्टी येथे भरदिवसा गोळीबार; एकाचा मृत्यू , ३ जण जखमी

हा वाद सुरू असताना गावातील लोक मदतीला आले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मुलाने गावकऱ्यांना धमक्या दिल्या. तरीही गावकऱ्यांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले. पोलिसांना या संपूर्ण घटनेची मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुभ्रदा मंहतो सरसापसी गावात राहतात. त्यांचे पती बुथुराम महंतो यांचे निधन झाले. सुभ्रदा त्यांची दोन मुले आणि सुनेसोबत राहत होती. मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सुभ्रदा धाकटा मुलगा शत्रुघ्न आणि सुनेसोबत राहत होत्या. दोन दिवसांपूर्वी शत्रुघ्नच्या शेतातून भाजी चोरीला गेली होती. ही भाजी आईने चोरल्याचा संशय मुलाला होता. यावरुन त्याने आईला मारहाण केली. याप्रकरणाची सर्व माहिती सुनेला मिळताच तिने रुग्णालयात जाऊन सासूला मारहाण केली. नर्स आणि डॉक्टरांनी सुनेला थांबवले. याप्रकरणी मुलगा आणि सुनेला ताब्यात घेण्यात आले आहे.

 Crime News
Pune Crime: जेवण न दिल्यानं नवऱ्याची सटकली; रागाच्या भरात बायकोच्या छातीत मारल्या बुक्या, महिलेचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com