Nanded News: उपचारासाठी आला, डुकरांच्या हल्ल्यात जीव गेला; नांदेड जिल्हा रुग्णालय परिसरातील संतापजनक घटना
संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी
Nanded Hospital News:
काही दिवसांपूर्वीच नांदेड रुग्णालयात मृत्यूंचे तांडव पाहायला मिळाले ज्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला. रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचे धिंडवडे निघाले होते.
हे प्रकरण शांत झाले असतानाच पुन्हा एकदा नांदेड रुग्णालय चर्चेत आले आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका युवकाचा रुग्णालय परिसरात डुकरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरातील घाणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Nanded Breaking News)
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेडच्या (Nanded) डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय परिसरात एका तरुणाचा डुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तुकाराम कसबे (वय, ३२) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो नांदेड शहराजवळच्या धनगरवाडी येथील रहिवासी आहे. मृत तरुणाला क्षयरोगाचा आजार होता.
त्याच्यावर गेल्या अकरा दिवसांपासून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या 9 तारखेला त्याला उपचारानंतर सुट्टीही देण्यात आली होती. आज सकाळी (शनिवार, ११ नोव्हेंबर) शौचालयास गेला असताना त्याच्यावर डुकराने हल्ला चढवत शरिराचे लचके तोडले. ज्यामध्ये त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रूग्णालय परिसरात तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. दरम्यान, एक महिन्यापूर्वीच नांदेडच्या याच रूग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाले होते. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्णालय परिसरात डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने घाणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.